Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Nanded Rain : नांदेडला आठ मंडलांत अतिवृष्टी

Rain Update : यामुळे आठ मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. शनिवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ३३.९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यात मागील आठ दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने शुक्रवारी (ता. २४) जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. हा पाऊस जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत झाला. पावसाचा जोर बिलोली, धर्माबाद, मुखेड, हदगाव, उमरी, भोकर, मुदखेड, नायगाव या तालुक्यांत अधिक होता. यामुळे आठ मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली.

शनिवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ३३.९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या ५९३.१० मिलिमीटरनुसार ६६.५४ टक्के पर्जन्यमान झाले आहे.

जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाने हजेरी लावल्यामुळे खरिपातील सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर आदी पिकांना दिलासा मिळाला होता. मागील शुक्रवारी (ता. १६) पावसाने जोरदार हजेरी लावली होती. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात २२ व २३ ऑगस्टला अतिवृष्टीचा इशारा दिला होता. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात उकाडा जाणवत होता.

अशावेळी शुक्रवारी दुपारनंतर जिल्ह्याच्या सर्वच भागांत पावसाने हजेरी लावली. या पावसाचा जोर सायंकाळी वाढला. हा पाऊस बिलोली, धर्माबाद, मुखेड, हदगाव, उमरी, भोकर, मुदखेड, किनवट, नायगाव या तालुक्यांत चांगला झाला.

यामुळे आठ मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. सोमवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ३३.९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या ५९३.१० मिलिमीटरनुसार ६६.५४ टक्के पर्जन्यमान झाले आहे.

अतिवृष्टी झालेले मंडल

लिंबगाव ११६.५०, नांदेड शहर ७०.७५, जांब ८१.५०, कुरुळा ८६.२५, पेठवडज ६५.८०, बारुळ ६५.८०, दिग्रस बुद्रुक ८६.२५, मुखेड ६५.८०.

तालुकानिहाय झालेला पाऊस

नांदेड ४९.८०, बिलोली ३२.६०, मुखेड ३४, कंधार ५८.६०, लोहा २८.५०, हदगाव २४.३०, भोकर २३.६०, देगलूर २०.८०, किनवट २५.२०, मुदखेड १५.५०, हिमायतनगर २७.१०, माहूर २९.२०, धर्माबाद ४७.८०, उमरी ३१.७०, अर्धापूर ४९, नायगाव ३५.४०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT