Humani Pest Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Humani Pest Kolhapur : पाऊस आला धावून, हुमणी गेली वाहून; ऊस पिकाला चांगलीच उभारी

Sugarcane Crop : शेतात पाणी तुंबून राहिल्यामुळे हुमणींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

sandeep Shirguppe

Humani Pest Control : जुलै मध्यावर आला तरी पावसाची उघडझापच सुरू होती. त्यामुळे पिकांवर किडींसह हुमणींचा प्रादुर्भाव जाणवू लागला होता. मात्र, गेल्या आठवडाभरापासून पावसाची संततधार सुरू आहे. शेतात पाणी तुंबून राहिल्यामुळे हुमणींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

यंदा वळीव चांगलाच बरसला. पण, मॉन्सूनने सुरुवातीच्या टप्प्यात म्हणावी तशी गती घेतली नव्हती. पेरणीला पुरेसा पाऊस झाला इतकेच म्हणावे लागेल. अगदी जुलै मध्यावर आला तरी त्याला जोर नव्हता. पडेत तिथे पडेल तोही कधी कोसळला कधी नाही असेच चित्र होते. त्यात फारसा जोर नसल्याने पिकांवर किडींचे प्रमाण वाढू लागले होते. पुरेसा पाऊसच झाला नसल्याने शेतातून पाणीही बाहेर पडले नव्हते. साहजिकच हुमणींनी डोके वर काढले होते. त्यांचा प्रादुर्भाव वाढू लागला होता.

कोल्हापूर जिल्ह्यात ऊस पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते या पिकाला हुमणींचा अधिक फटका बसू लागला होता. हुमणींना प्रतिबंध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आळवणीचे प्रयोग सुरू केले होते. पण, उसाच्या मुळाला औषध सोडल्यानंतर हुमणी अधिक खोल जात होती. ओलावा नसलेल्या ठिकाणी तर आळवणीचाही काहीच उपयोग होत नसल्याचे समोर आले होते. शेतात पाणी तुंबून राहणे हाच एक पर्याय राहिला होता. त्यासाठी जोरदार पावसाची गरज होती.

दरम्यान, गेल्या आठवडाभरापासून पावसाची संततधार सुरू आहे. जोरदार पावसामुळे शेतांमध्ये पाणी चांगलेच तुंबले आहे. तुंबलेल्या पाण्यामुळे हुमण्यांचा प्रादुर्भाव कमी होण्याला मदत झाली आहे. उसाला हुमणी लागली तर त्याचा मोठा फटका बसतो. उसाच्या उत्पादनात घट येते. या संकटात पाऊसच धावून आल्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

वाऱ्याने ऊस पडला

एकीकडे पावसाची संततधार हुमणींचा प्रादुर्भाव कमी करण्यास सहाय्यभूत ठरली आहे. पण, शेतात पाणी तुंबल्यामुळे उसाची मुळे सैल झाली आहेत. त्यात दोन दिवसापासून पावसासोबत वाऱ्याचाही जोर वाढला आहे. या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी ऊस पडला आहे. चांगली वाढ झालेला ऊसच वाऱ्यामुळे प्रभावित झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT