Maharashtra Rain Farmers : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान, विरोधकांनी केली मदतीची मागणी

Maharashtra Rain : राज्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून राज्यात हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
Maharashtra Rain Farmers
Maharashtra Rain Farmersagrowon
Published on
Updated on

Heavy Rains Maharashtra : राज्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून राज्यात हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला असून शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत केली पाहिजे अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. त्याचबरोबर नागरिकांनी जीव धोक्यात घालून घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.

राज्यात मागच्या काही दिवसात पूर्व विदर्भ, पुणे, कोल्हापूर, रायगड या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हवामान खात्याचा हा अंदाज आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी आज माध्यम प्रतिनीधींशी संवाद साधला.

वडेट्टीवार म्हणाले की, मुंबई आणि पुण्यासारखी मोठी शहरे अतिवृष्टीमुळे जलमय झाली आहेत. या मोठ्या शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतीमधील नागरिकांच्या निवाऱ्याची व्यवस्था सुरक्षितस्थळी करण्यात यावी. विदर्भातील चंद्रूपूर, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू आहे.

पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून तेथे नागरिकांना मदत करावी. नागरिकांनी जीव धोक्यात घालून घराबाहेर पडू नये. नद्या, नाले, ओढे, धबधबे, धरण, दरडप्रवण क्षेत्र, घाट, पूरप्रवण क्षेत्र, पर्यटनस्थळे अशा ठिकाणी नागरिकांनी जाणे टाळावे, असे आवाहनही श्री. वेडेट्टीवार यांनी केले.

अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर, सांगली शहरांना पुराचा धोका होऊ नये यासाठी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

Maharashtra Rain Farmers
Kolhapur Satara Dam Water : राधानगरी धरणाचा एक दरवाजा उघडला; कोयना, काळम्मावाडी धरणाची जाणून घ्या स्थिती

सतेज पाटील भेटले कर्नाटक मुख्यमंत्र्यांना

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी आज कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार व नामदार एच. के. पाटील यांची भेट घेतली. महापुराची परिस्थिती उदभवू नये अशा पद्धतीने अलमट्टी धरणातून होणाऱ्या पाणी विसर्गाचे आवश्यक ते नियोजन करण्याची सूचना संबंधित अधिकारी व विभागांना करावी, अशी मागणी केली.

याला सकारात्मक प्रतिसाद देत नामदार डी.के. शिवकुमार जी यांनी अलमट्टी धरणातील पाणीसाठा आणि विसर्गाबाबत त्वरित योग्य उपाययोजना करण्याबाबत सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com