Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain Crop Damage : खानदेशात पावसाने कापूस, तूर, फळबागांची मोठी हानी

Crop Damage : खानदेशात रविवार (ता. २६) व सोमवारी (ता. २७) झालेल्या पावसात तूर, कापूस व फळ बागांची मोठी हानी झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात रविवार (ता. २६) व सोमवारी (ता. २७) झालेल्या पावसात तूर, कापूस व फळ बागांची मोठी हानी झाली आहे. अनेक गावांत कापूस पीक आडवे झाले असून, शेतकरी चिंतेत आहेत. पंचनामे सुरूच आहेत.

मंगळवारी (ता. २८) खानदेशात अपवाद वगळता पाऊस फारसा नव्हता. काही भागांत मध्यम पाऊस झाला. परंतु रविवार व सोमवारच्या पावसात भडगाव, पाचोरा भागांतील लिंबू, पेरू, चिकूच्या बागांचे नुकसान झाले आहे. याबाबतत पंचनामे अद्याप सुरू झालेले नाहीत, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

यंदा समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे नगदी पीक असलेल्या कापसाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यात कपाशीला भाव नाही. अशातच पावसामुळे होती नव्हती ती कपाशी अक्षरशः जमिनदोस्त झाली आहे.

त्यामुळे खानदेशातील शेतकऱ्यांवर जणू अस्मानी संकट कोसळले आहे. कारण खानदेशात कापूस प्रमुख पीक असून, सुमारे साडेआठ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. यात कोरडवाहू कापसाखालील क्षेत्र सुमारे सात लाख हेक्टर एवढे आहे.

यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी उभ्या कापसाच्या पिकावर ‘रोटाव्हेटर’ फिरवून रब्बी हंगामातील गहू, हरभरा व मका पीक घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रविवारी मॉन्सुनोत्तर पाऊस झाला. पावसामुळे शेतात उभे असलेले कापसाचे पांढरे बोंड जमिनीवर पडल्याने हंगाम पाण्यात गेला आहे. पारोळ्यातील (जि. जळगाव) मोहाडी- दहिगाव परिसरात वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब आडवे झाले आहेत. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा बराच वेळ खंडित होता.

सद्यःस्थितीत तालुक्यात कापूस वेचणीसह रब्बी हंगामाच्या मशागतीला सुरुवात झालेली असताना हे संकट कोसळल्याने होत्याचे नव्हते झाले आहे. अवकाळी पावसामुळे जो काही कापूस ओला झाला आहे, तो सुकविण्यासाठी शेतकरी उन्हाची प्रतीक्षा करीत आहे.

तूर पीकही आडवे झाले असून, शेंगा, फुलांचे नुकसान वाढत आहे. कारण सूर्यप्रकाश नसल्याने पीक आडवेच आहे. ओलावा असून, त्यात शेंगा खराब होत आहेत. खानदेशात पंचनामे सुरू आहेत. यात नुकसानीचा नेमका आकडा

प्रशासनाने सादर केलेला नाही. परंतु खानदेशात सुमारे २५ हजार हेक्टरवरील विविध पिकांचे मोठो नुकसान झाल्याची माहिती आहे. तातडीने पंचनामे करून प्रशासनाने अहवाल सादर करावा. विमा कंपनीकडे तक्रारी दाखल होत असून, त्यावरही कार्यवाही केली जावी, अशी मागणी केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT