Heavy Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Nanded Heavy Rain : नांदेडमध्ये ९३ पैकी ७५ मंडलांत अतिवृष्टी

Crop Damage :जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरिपातील साडेचार लाख हेक्टरपेक्षा अधिक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही अतिवृष्टी जिल्ह्यातील ९३ पैकी तब्बल ७५ मंडलांत नोंदली गेली.

Team Agrowon

Nanded Rain : नांदेड :जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरिपातील साडेचार लाख हेक्टरपेक्षा अधिक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही अतिवृष्टी जिल्ह्यातील ९३ पैकी तब्बल ७५ मंडलांत नोंदली गेली. यात चार मंडलांत चारवेळा, नऊ मंडलांत तीन वेळा, १६ मंडलांत दोन वेळा, तर ४६ मंडलांत एक वेळा अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. या अतिवृष्टी मंडलात सर्वाधिक नांदेड व किनवट तालुक्यातील महसूल मंडलाचा समावेश आहे. जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या पावसाळ्याच्या पाच महिन्यांत सरासरी ८९१.३० मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा मात्र पावसाने जिल्ह्याला भरभरून दिले आहे.

आजपर्यंत सरासरी ६६३.८० मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षीत असते. मात्र जिल्ह्यात आज रोजीपर्यंत ११५ टक्क्यांनुसार ७५९.९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या ८५.२६ टक्के झाला आहे. पावसाचे प्रमाण चांगले असलेतरी सप्टेंबरच्या पहिल्या दिवसापासून जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. हा पाऊस जिल्ह्याच्या सर्वच भागांत झाला. या काळात जिल्ह्यातील ९३ पैकी तब्बल ७५ मंडलात अतिवृष्टी नोंदली गेली. यात चार मंडलांत चार वेळा, नऊ मंडलांत तीन वेळा, १६ मंडलांत दोन वेळा, तर ४६ मंडलांत एक वेळा अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. या अतिवृष्टी मंडलांत सर्वाधिक नऊ मंडले नांदेड व किनवट तालुक्यातील सात महसूल मंडलांचा समावेश आहे.

पावसाचे प्रमाण प्रचंड असल्यामुळे सर्वच नद्या-नाल्यांना पूर आला. मुख्य नद्या काठोकाठ भरून वाहू लागल्याने पुराचे पाणी नाल्यालगतच्या शेतात दोन ते तीन दिवसांपर्यंत साचून राहिले. परिणामी, जिल्ह्यातील खरिपाचे साडेचार लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. नुकसानीबाबत सर्वे करण्याचे काम जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने सुरू आहे. यासोबतच अतिवृष्टी झालेल्या मंडलात पीकविमा कंपनीकडून पंचनामे करण्याचे कामही सुरू आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पीक विमाधारक शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम मिळावी, यासाठी मंडलनिहाय नुकसानीबाबत सर्व्हे करण्याचे आदेश दिले आहेत.

आजपर्यंत अतिवृष्टी झालेली मंडले

चार वेळा अतिवृष्टी झालेली मंडले : करुळा, दिग्रस बुद्रुक, माळाकोळी व जलधारा. तीन वेळा अतिवृष्टी झालेली मंडले : लिंबगाव, आदमपूर, सोनखेड, पिंपरखेड, सिंदगी, वाई, जांब व अर्धापूर. दोन वेळा अतिवृष्टी झालेली मंडले : धानोरा, सिरजखेड, धर्माबाद, जवळगाव, मुदखेड. आष्टी, तामसा, मनाठा, तळणी, हदगाव, पेठवडज, कंधार, बाऱ्हाळी, जाहूर, बिलोली व नांदेड शहर. एक वेळा अतिवृष्टी झालेली मंडले : दाभड, मालेगाव, भोकर, मोघाळी, किनी, मरखेल, माळेगाव (मक्ता), हणेगाव, नरंगल बुद्रुक, हिमायतनगर, सरसम, किनवट, बोधडी, इस्लापूर, शिवणी, मांडवा, सिंदखेड, दहेली, उमरी बाजार, कापसी बुद्रुक, शेवडी, कलंबर, माहूर, वानोळा, मुगट, आंबुलगा, कुंटूर, नरसी, माजंरम, नांदेड ग्रामीण, तुप्पा, वसरणी, विष्णुपुरी, तरोडा, वाजेगाव, नाळेश्‍वर, रामतीर्थ, लोहगाव, सगरोळी, जारीकोट, निवघा, मुखेड, मुक्रमाबाद, बारुळ व बारड.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pest Outbreak: हवामान बदलामुळे वाढला विषारी सुरवंटांचा प्रादुर्भाव

Indigenous Cattle Breeding: शाश्‍वत शेतीसाठी देशी गोवंश संवर्धन

Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, अचानक भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चा, नेमकं कारण काय?

Modern Fruit Plantation: फळझाडे लागवडीसाठी आधुनिक यंत्रे

Agriculture Machinery: जुन्या रिक्षा इंजिनापासून बहुउपयोगी कृषी यंत्र

SCROLL FOR NEXT