Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain : अतिवृष्टीचा रत्नागिरीतील १४५ गावांना तडाखा

Rain Alert : रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा १४५ गावातील १ हजार १९१ शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यात महिनाभरात पडलेल्या अतिवृष्टीने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. पडझडही मोठ्या प्रमाणात झाली. या अतिवृष्टीचा जिल्ह्यातील १४५ गावातील १ हजार १९१ शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. भात, नगदी आणि इतर पिके अशा एकूण २३१.४९ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. तसा अहवाल जिल्हा कृषी विभागाकडून तयार करण्यात आला आहे.

जिल्ह्यात १ ते २८ जुलैदरम्यान अतिवृष्टीने जनजीवन विस्कळित झाले होते. यावर्षी पावसाने खरिपातील शेतलावणी कामांना चांगली साथ दिली; परंतु त्यानंतर अतिवृष्टीमुळे अनेक गावांतील शेतीला फटका बसला. जिल्ह्यातील मोठ्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठची शेती पाण्याखाली गेली.

यामुळे शेतीचे नुकसान झाले. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने कृषी विभागाला दिले होते. जिल्ह्यात खरीप पिकांखालील भातशेती सरासरी एकूण ६८०८८.३७ हेक्टरवर आहे. प्रत्यक्ष पेरणी ३५८८८.०६ क्षेत्रावर झाली. नगदी पिकाखालील सरासरी १०३९८.२१ हेक्टर क्षेत्र आहे. प्रत्यक्ष ३२९९.८८ हेक्टरवर पेरणी झाली. लावण्यांची कामे ७० टक्के पूर्ण झाली आहेत.

तालुकानिहाय नुकसान

मंडणगडमध्ये १० गावांतील एकूण ५४ शेतकऱ्यांचे ४.५४ हेक्टर क्षेत्र बाधित

दापोली : ३१ गावांतील १५० शेतकऱ्यांचे १७.४३ हेक्टर क्षेत्र बाधित

खेड : ५४ गावांतील ५३३ शेतकऱ्यांचे १७४.५५ हेक्टर क्षेत्र बाधित

चिपळूण : ७ गावांतील २८ शेतकऱ्यांचे ०.६८ हेक्टर क्षेत्राला फटका

गुहागर : १० गावांतील १८ शेतकऱ्यांचे १.२८ हेक्टरचे नुकसान

संगमेश्वर : २३ गावांतील ३६० शेतकऱ्यांचे २९.०५ हेक्टरचे नुकसान

राजापूर : १० गावांतील ४८ शेतकऱ्यांचे ३.९६ हेक्टरवर नुकसान

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Common Mobility Card: एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य; महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय

Laxman Hake: ओबीसींच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही लक्ष्मण हाके मुंबईकडे जाण्यावर ठाम

Madgyal Sheep Breed: ओळख माडग्याळ मेंढीची...

Sericulture Farming: रेशीम शेतीतून अर्थकारणाला गती

Indian Economy : अर्थव्यवस्थेत पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ; शेतीचं चित्र पावसावर अवलंबून

SCROLL FOR NEXT