Heavy Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain Marathwada : मराठवाड्यातील ५७ मंडलांत अतिवृष्टी

Rain Update : छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड व हिंगोली या चार जिल्ह्यांतील तब्बल ५७ मंडलांत गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात अतिवृष्टी नोंदली गेली.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : मध्यंतरी मराठवाड्यात कुठे आहे तर कुठे नाही, कुठे प्रदीर्घ ओढ देणारा पाऊस गुरुवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासात मात्र अनेक भागात सक्रिय झाल्याची स्थिती आहे.

छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड व हिंगोली या चार जिल्ह्यांतील तब्बल ५७ मंडलांत गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात अतिवृष्टी नोंदली गेली. तर दुपारपर्यंत अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस सुरूच होता, अशी माहिती आहे.

माहितीनुसार, की नांदेड जिल्ह्यात गुरुवारी सकाळपर्यंतचे २४ तासात सर्वाधिक सरासरी ६०.३ मिलिमीटर पाऊस झाला. त्या पाठोपाठ हिंगोली जिल्ह्यात सरासरी ४८.१ मिलिमीटर, छत्रपती संभाजीनगरमध्ये २६.२ मिलिमीटर, जालन्यात २४.१ किलोमीटर, परभणीत सरासरी २२.१ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली.

बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात पावसाचा जोर कमीच होता. बीड जिल्ह्यात सरासरी १.२ मिलिमीटर, लातूरमध्ये ४.१ मिलिमीटर, धाराशिवमध्ये सरासरी ०.३ मिलिमीटर पाऊस झाला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ५ मंडळात अतिवृष्टी झाली. तर नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ४६ मंडलांत, तर हिंगोली जिल्ह्यातील दहा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. अनेक भागांत मोठ्या आलेला हा पाऊस खरीप पिकासाठी जीवदान देणारा ठरला आहे. अनेक ठिकाणी रात्रभर पावसाची रिमझिम सुरू होते.

जिल्हानिहाय अतिवृष्टीची मंडळे व पाऊस (मिलिमीटरमध्ये)

छत्रपती संभाजीनगर

पिशोर ७७.२५

नाचनवेल ९८.५०

करंजखेड १०१.५०

भराडी ७६

बाबरा ८१.५०

जालना जिल्हा

धावडा ६६.२५

अनवा ६५.२५

वरुड ७६.५०

हिंगोली जिल्हा

वाकोडी ७८.५०

आखाडा ९४.२५

डोंगरकडा ७०.७५

वारंगा ६७.५०

वसमत ६६

आंबा ६६

हयातनगर ६६

गिरगाव ६७

टेंभुर्णी ६६

कुरुंदा ७३.७५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Adulteration: भेसळयुक्त दूध आरोग्यासाठी धोकादायक; घरच्या घरी तपासा दुधातील भेसळ

River Linking Project: दुष्काळमुक्तीकडे वाटचाल, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला ७८ टीएमसी पाणी मिळणार- मुख्यमंत्री फडणवीस

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार, कापूस स्थिर, टोमॅचो आवक सुधारली, डाळिंबाला उठाव, मिरचीला उठाव टिकून

Land Acquisition: ‘शक्तिपीठ’साठी पारदर्शक भूसंपादन हवे

NA Permission Rule: शेतजमिनीवर घर बांधण्यासाठी ‘NA’ परवानगीची अट रद्द ; राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT