Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain : जेवळी परिसरात जोरदार पावसामुळे मोठे नुकसान

Pre Monsoon Rain : जेवळी (ता. लोहारा) व परिसरात रविवारी (ता. १२) दुपारी दीड ते तीन या काळात मेघगर्जना व सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला.

Team Agrowon

Dharashiv News : जेवळी (ता. लोहारा) व परिसरात रविवारी (ता. १२) दुपारी दीड ते तीन या काळात मेघगर्जना व सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यात काही काळ गारापीटही झाली. जवळपास दीड तास झालेल्या या मुसळधार पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बेन्नीतुरा नदीपात्र भरून वाहिले. गावात ठिकठिकाणी घरावरील पत्रे उडाले. गावात व शिवारात झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला.

जेवळी व परिसरातील गावांत रविवारी दुपारी दीड ते तीन या काळात अचानक आकाशात मेघांची गर्दी होत मेघगर्जना व प्रचंड वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या वेळी दहा-पंधरा मिनिटे गारपीटही झाली. या मुसळधार पावसाबरोबरच मोठ्या प्रमाणात मेघगर्जना व वारा होता. यामुळे काही काळ नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

गावात अनेक घरांवरील पत्रे उडाले, गावात व शिवारात झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. या पूर्वमोसमी पावसामुळे गावात रस्त्यांवरून पाणी वाहिले असून ठिकठिकाणी घरात पाणी शिरले. लोहारा-आष्टामोड या मार्गावर ठिकठिकाणी नाले दुधडी भरून वाहिल्याने काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

शिवारात सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. बांध, बंधाऱ्याचे नुकसान झाले. एका वर्षानंतर परिसरातील नदी-नाले वाहिले असून लोहारा, उमरगा तालुक्यांतून वाहणारी बेन्नीतुरा नदी मुसळधार पावसाने दुथडी भरून वाहत होती. हा पाऊस जेवळीसह परिसरातील भोसगा, फनेपूर, वडगाव, वडगाव वाडी, रुद्रवाडी, विलासपूर पांढरी, हिप्परगा सय्यद आदी गावांत कमी-जास्त प्रमाणात झाला.

जेवळी शिवारातील वीजपुरवठा ठप्प होता. परंतु गावातील वीजपुरवठा सोमवारी सुरळीत झाला. रविवारी सायंकाळनंतर पुराचे पाणी ओसरल्याने कोलमडलेली वाहतूकही सुरळीत झाली. एरवी दमदार पाऊस पडूनही शेताबाहेर पाणी येत नाही. परंतु तब्बल दीड वर्षानंतर रविवारी दुपारी झालेल्या अति जोरदार पावसाने शेती बांधाची मोठी हानी केली.

जेवळी येथील ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांची यात्रा सुरू आहे. या पावसामुळे कुस्तीच्या फडात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रविवारी (ता. १२) सायंकाळी होणारी कुस्तीची दंगल रद्द करण्यात आली. यामुळे दुरून आलेल्या पैलवान व कुस्तीप्रेमींची निराशा झाली. या पावसाने यात्रा कमिटीने ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या सजावट व मंडपाचे मोठे नुकसान झाले. या निमित्त मंदिरापुढे थाटलेल्या विविध दुकानांत पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसानंतर यात्रेचे समारोपीय सर्व कार्यक्रम रद्द झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fodder Management: कमी पावसाच्या स्थितीत चाऱ्याचे आत्तापासून करा नियोजन

Gharkul Yojana : सोलापुरात ३ हजारांहून अधिक घरकुल लाभार्थींना ७२२२ ब्रास वाळूचे वाटप

Weed Removal Begins: भात, नाचणी पिकांत तण काढणी सुरू

Sugarcane Dues : जिल्ह्यात ३३७ कोटींची ऊसबिले अद्यापही थकीत

Ravikant Tupkar: रविकांत तुपकरांना पोलिसांची नोटीस; पण आंदोलनावर ठाम

SCROLL FOR NEXT