Heavy Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain : सिन्नर तालुक्यातील सोनांबे परिसरात अतिवृष्टी; शेतकऱ्यांची चिंता वाढली

Rain Update : नाशिक जिल्ह्यात बुधवारी (ता.९) दुपारनंतर अनेक भागांत झालेल्या जोरदार पावसामुळे दाणादाण उडाली आहे.

Team Agrowon

Nashik News : नाशिक जिल्ह्यात बुधवारी (ता.९) दुपारनंतर अनेक भागांत झालेल्या जोरदार पावसामुळे दाणादाण उडाली आहे. सिन्नर, दिंडोरी, इगतपुरी तालुक्यांत मोठा जोर दिसून आला. सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील सोनांबे महसूल मंडलात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, भाजीपाल्यासह छाटणी झालेल्या द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. काही ठिकाणी हाताशी आलेला घास पावसामुळे हिरावला गेल्याची स्थिती आहे

बुधवारी दुपारनंतर अचानक आलेल्या पावसामुळे अनेक भागांत कापणी केलेला सोयाबीन, मका भिजला आहे. द्राक्ष पट्ट्यात सुरू असलेली छाटणीची कामे ठप्प झाल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद सोनांबे महसूल मंडलात ८० मिमी नोंद झाली आहे. सटाणा, कळवण, नांदगाव, सिन्नर, दिंडोरी, सुरगाणा, चांदवड, त्र्यंबकेश्वर, देवळा, नाशिक, निफाड तालुक्यांतील विविध भागांत मध्यम ते हलक्या पावसाने हजेरी लावली.

दिंडोरी तालुक्यातही संध्याकाळच्या वेळी आलेल्या पावसामुळे द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. यामध्ये मोहाडी, जानोरी, खेडगाव, कसबे वणी, राजापूर, तिसगाव जोपूळ आदी गावांत पावसाने हजेरी लावली. त्यामुळे छाटणीची कामे थांबली आहेत. डाऊनीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने आता शिवारात फवारण्या सुरू आहेत.

...असे झाले नुकसान

नवीन टाकलेल्या रब्बी कांदा रोपवाटिकांचे नुकसान.

मका काढणी व मळणीची कामे खोळंबली.

सोयाबीन पीक पाण्यात भिजले, तर मळणी कामे ठप्प.

भाजीपाला पिकांवर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला.

घोरवड (ता.सिन्नर) येथे दामू शेखरे यांचा बैल विजेच्या धक्क्याने दगावला.

वांगण सुळे (ता.सुरगाणा) येथील जयराम सयाजी टोपले यांच्या घराचे पावसाने नुकसान.

सोनांबे-कोनांबे परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. तसेच द्राक्ष बागा काही फुलोरा व पोंगा अवस्थेत आहेत. तर काही भागांत दोडा अवस्थेत आहेत. पावसाचे थेंब मोठे असल्याने कोवळी पाने खराब झाली. या नुकसानीचे पंचनामे व्हावेत.
नंदू काशिनाथ पवार, संचालक-महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT