Kolhapur Rain Update agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Rain Update : बऱ्याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर वळीवाची बळीराजाला साथ

Heavy Rainfall : गगनबावडा, शाहुवाडीसह कागल तालुक्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

sandeep Shirguppe

Kolhapur Weather : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या १० दिवसात ढगाळ वातावरणाची स्थिती होती परंतु पाऊस नसल्याने धुळवाफ पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा लागून राहिलेल्या बळीराजाला दिलासा मिळाला. काल जिल्ह्यातील अनेक तालुक्यात कुठे जोरदार तर कुठे मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या. यामुळे खोळंबलेल्या पेरण्यांना जोर आला आहे. तर तुकड्याची माळरानावरील शेती असलेला शेतकरी मशागतीच्या कामांना वेग देत असल्याचे चित्र आहे.

मात्र, गेल्या तीन ते चार दिवसापासून ढगाळ वातावरणाने जिल्हा अच्छादला आहे. पाऊस येईल अशी अपेक्षा आहे. ठराविक ठिकाणे वगळता इतर ठिकाणी पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. काल दिवसभर ढगाळ वातावरणामुळे उष्णतेचा पारा कमी राहिला.

हातकणंगले, करवीर, शिरोळ, गगनबावडा, शाहुवाडीसह कागल तालुक्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. दरम्यान, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडूप्रमाणे दक्षिण महाराष्ट्रात मॉन्सूनपूर्व वातावरण तयार झाले आहे. केरळकडून हळूहळू मॉन्सून सर्वदूर पोचत आहे. त्यामुळे पावसाच्या स्वागतासाठी बळीराजा आतुरला आहे.

वळीवाची चांगली साथ

कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडूनंतर आता दक्षिण महाराष्ट्रात मॉन्सूनपूर्व पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान मॉन्सूनसाठी आवाश्यक वातावरण तयार झाल्याने या परिसरात ८ जूनपर्यंत प्रत्यक्ष मॉन्सूनला सुरुवात होईल. त्यानंतर हळूहळू कोकण, कोल्हापूरसह इतर ठिकाणी मॉन्सूनला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केल्याने दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात वळीव आणि मॉन्सूनपूर्व पावसाने चांगली साथ दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT