Vegetable Market Kolhapur : दोडका, वांगी, फ्लॉवर गड्डा, कोबी, गवारची दर तेजीत, भाजीपाला आवक घटली

Bhajipala Market : दोडका, वांगी, फ्लॉवर गड्डा, कोबी, गवारची दरात वाढ झाली आहे. टोमॅटो तीस रुपये प्रतिकिलो असा दर पोहोचला आहे.
Vegetable Market Kolhapur
Vegetable Market Kolhapuragrowon

Kolhapur Vegetable Market : उन्हाचा तडाखा आणि पाण्याच्या कमतरतेने भाजीपाला आवक कमी आणि दरात दुप्पटीने वाढ झाली. मेथी तीस, कोथिंबीर अजूनही पन्नाशीतच आहे. अन्य भाज्यांचे दर कमीत कमी २० रुपये प्रति पेंडी झाले आहेत. दोडका, वांगी, फ्लॉवर गड्डा, कोबी, गवारची दरात वाढ झाली आहे. टोमॅटो तीस रुपये प्रतिकिलो असा दर पोहोचला आहे.

बाजारात गेल्या महिनाभरापासून कडक उन्हाळ्यामुळे भाजीपाला आवक घटली आहे. सातत्याने दर चढेच राहिले आहेत. मेथी, कांदापात, पोकळा, शेपू, कोथिंबीरीची घाऊक बाजारातच आवक कमी झाली आहे. त्यामुळे अनेकांनी कडधान्याकडे मोर्चा वळविला आहे. फळभाज्यांचेही दर भाजीपाल्याप्रमाणेच वाढले आहेत.

पावसाने आणखी ओढ दिल्यास भाजीपाल्यासह फळभाज्यांचे दरही आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तविली जात आहे. मागील आठवड्यात दोनशे रुपये किलो असा भाव खाणारा लसूण या आठवड्यात १०० ते १६० रु. किलो असा उतरला आहे.

भाजीपाल्याचे दर

मेथी ३० ते ४० रु. पेंडी पोकळा, पालक, करडा, कांदापात २० ते २५ रुपये पेंडी,

फळ भाज्यांचे किलोचे दर रुपयात

वांगी ६०, दोडका ६० ते ८०. कोबी २० ते ३० रूपये नग, टोमॅटो ३० ते ४०. ढब्बू मिरची ८०. गवार ६० ते ७०. घेवडा ८० ते १००. बिनीस १०० ते १२०. भेंडी ४०. हिरवा टोमॅटो २० ते ३०. गाजर ४०. फ्लॉवर गड्डा २० ते ४०. पडवळ १० ते २०. ओली मिरची ८० ते १००. गवारी ६० ते ८०. लिंबू १० रु. तीन नग

Vegetable Market Kolhapur
Agriculture Commodity Market : मूग, तुरीच्या दरात घसरण

तेल दरात किंचित वाढ

शेंगतेल २०४ रु. किलो, सरकी ११६ रु.

(चार रुपयाने प्रतिकिलो दरात वाढ)

सोयाबीन ११२ रु. किलो, सूर्यफूल १२०. खोबरेल २४०.

तोतापुरी, रायवळची आवक वाढली रत्नागिरी, देवगड हापूसची आवक कमी झाली असून, तोतापुरी, रायवळ आंब्याची आवक वाढली आहे. तोतापुरीची दर ६० ते ८० रु. किलो असा दर असला तरी काही ठिकाणी १५ ते २५ रु. नग अशा दराने विक्री होत आहे. रायवळी आंब्याचा ६० ते ९० रु. प्रतिडझन असा भाव आहे.

अन्य फळांचे दर असे

चिकू ६० रु. पेरू (मोठा) ८० ते १००. सफरचंद १७० ते २६०. डाळिंब ६० ते ८०. कलिंगड- २० ते ६० रु. नग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com