Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain Khandesh : खानदेशात पावसाचा हाहाकार

Hailstorm Update : खानदेशात रविवारी (ता.२६) रात्री सर्वत्र पाऊस झाला. नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात गारपीटदेखील झाली.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात रविवारी (ता.२६) रात्री सर्वत्र पाऊस झाला. नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात गारपीटदेखील झाली. यामुळे कांदा, केळी, पपई, कापूस, हरभरा आदी पिकांची हानी झाली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात रविवारी सायंकाळी वादळी पाऊस झाला. यात नंदुरबार, शहादा भागात वृक्ष उन्मळून पडले. त्यामुळे खंडीत झालेला वीजपुरवठा सोमवारी (ता.२७) देखील सुरळीत झालेला नव्हता.

शहादा व लगतच्या परिसरात झालेल्या गारपिटीमुळे पपई पिकाचे मोठे नुकसान झाले. तसेच कांदा पिकालाही फटका बसला आहे. नंदुरबारात नवापूर, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव भागांतही चांगला पाऊस झाला आहे.

धुळ्यातही शिरपूर, धुळे, शिंदखेडा, साक्री भागांत पाऊस झाला. यामुळे कांदा, शेतात ठेवलेला कडबा आदींचे नुकसान झाले आहे. तसेच वेचणीवर आलेला कापूस ओला झाला असून, बोंडे काळवंडण्याची शक्यता आहे. जळगावातही जळगाव, धरणगाव, एरंडोल, चोपडा, अमळनेर, पारोळा, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, जामनेर, यावल, बोदवड आदी भागांतही रात्रभर पाऊस सुरू होता.

खानदेशात सोमवारी सकाळपासून पावसाची रिपरीप सुरू होती. सुसाट वारा व हलका पाऊस अशी स्थिती जळगाव, धरणगाव, चोपडा, भुसावळ आदी भागात होती. शिरपूर, शहादा, तळोदा भागातील काही मंडलांत ४० मिलिमीटरपर्यंत पाऊस झाला आहे. जळगाव तालुक्यात ४० मिलिमीटर पाऊस झाल्याची माहिती देण्यात आली.

नंदुरबार, शिरपूर भागांत गारपीट झाली आहे. या भागात पपई काढणीवर आहे. पावसामुळे पपईची मोठी हानी झाली आहे. तसेच नवीन केळी बागांचेही अंशतः नुकसान झाले आहे. वृक्ष उन्मळल्याने शिरपूर, शहादा शिवारात वीजपुरवठा खंडीत झाला आहे. तसेच अनेक गावांतही वीज बंद आहे.

शेतीकामे ठप्प

अधिकच्या पावसाने शेतीकामे सोमवारी ठप्प होती. अनेक शेतकऱ्यांचा कापूस वेचणीवर आला आहे. या वेचणीला पावसाने अडथळा आल्याने कापूस ओला होत आहे. त्यामुुळे दर्जा खालावून दर घटण्याची शक्यता आहे. शेतीकामे ठप्प असल्याने नुकसान अधिकचे होणार आहे. केळी, पपईची काढणीदेखील बंद झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीची यादी आज प्रसिद्ध होणार?

DBT Reform: ‘डीबीटी’तील त्रुटी दूर करण्यासाठी हालचाली

Digital Land Survey: देशभरात ४५ कोटी शेतजमिनींचे डिजिटल सर्वेक्षण

Farmer Protest: पंजाब, हरियानाचे शेतकरी दिल्लीकडे

CJP Protest: ‘सीजेपी’चा आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार; विद्यार्थ्यांवर हल्ल्याचा दिल्ली पोलिसांवर आरोप

SCROLL FOR NEXT