Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Vidarbha Heavy Rain : विदर्भात २५८ मंडलांत अतिवृष्टी; उर्वरित राज्यात जोर कमी

Monsoon Rain: तीन दिवसांपासून विदर्भात मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी दमदार पाऊस हजेरी लावत आहे. विदर्भातील २५८ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

Team Agrowon

Pune News: तीन दिवसांपासून विदर्भात मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी दमदार पाऊस हजेरी लावत आहे. विदर्भातील २५८ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. बुधवारी (ता. ९) सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांत नागपूर जिल्ह्यातील कुही सर्वाधिक येथे २७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. राज्यात अन्य जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी झाला असून नाशिक, सोलापूर, कोल्हापूरमध्ये पावसाने उघडीप दिली.

विदर्भात तीन दिवसांपासून बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदीया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडत आहे. त्यातही नागपूरसह पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे. नागपूर विभागातील गोसीखूर्द धरणातून ३ लाख १७ हजार क्युसेकने वैनगंगा नदीमध्ये विसर्ग सोडण्यात आला आहे.

नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला. पेंच तोतलाडोह, इटियाडोह, शिरपूर, इरई, निम्न वर्धा तसेच अमरावती विभागातील उर्ध्व वर्धा, बेंबळा, आरुणावती, काटेपूर्णा, वाण, पेनटाकळी, खडकपूर्णा या धराणांत नव्याने पाण्याची आवक सुरु आहे.

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर जिल्ह्यांत अधूनमधून पावसाचा शिडकावा होत आहे. तर मध्य महाराष्ट्राच्या घाटामाथ्यावर सरी कोसळत आहेत. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, नाशिक तर खानदेशातील धुळे, जळगाव आणि नंदूरबार जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. मराठवाड्यातही अशीच स्थिती आहे.

येथे पडला सर्वाधिक पाऊस, मिलिमीटरमध्ये

उमरेड, माकरढोकडा २१३

हेवंती, दारव्हा २१३

कुही २७०

पाचखडी २००

वेलतूर राजोळी २३६

नागभिड, मिढाळा २३०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Incentive Subsidy Scheme : पात्र शेतकऱ्याला प्रोत्साहन अनुदानापासून वंचित ठेवले

Kukadi Water Storage: ‘कुकडी’त ६८ टक्के पाणीसाठा

Agrowon Podcast: मक्याचा बाजार स्थिर; कापूस दर स्थिर, टोमॅटोमध्ये काहीसे चढ उतार, तर डाळिंब व केळीला चांगली मागणी कायम

Mhaisal Lift Irrigation : ‘म्हैसाळ’साठी सौरऊर्जा प्रकल्पाचा नव्या वर्षात प्रारंभ

Wildlife Crop Damage : शाहूवाडीत वन्यप्राण्यांचा धुमाकूळ, शेतीचे नुकसान

SCROLL FOR NEXT