Heavy Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Pune Heavy Rain: वडगाव, न्हावरे येथे दमदार पाऊस

Pune Rain Update: पुणे जिल्ह्यात जवळपास पंधरा दिवसांच्या खंडानंतर पुन्हा मॉन्सूनच्या पावसाने जोर धरण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी (ता.१२) सकाळी आठ वाजेपर्यंत शिरूरमधील वडगाव, न्हावरे येथे जोरदार पाऊस पडला असून, सर्वाधिक ५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: पुणे जिल्ह्यात जवळपास पंधरा दिवसांच्या खंडानंतर पुन्हा मॉन्सूनच्या पावसाने जोर धरण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी (ता.१२) सकाळी आठ वाजेपर्यंत शिरूरमधील वडगाव, न्हावरे येथे जोरदार पाऊस पडला असून, सर्वाधिक ५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे खरिपातील पेरण्यांना सुरुवात होण्याची चिन्हे आहेत.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले होते. त्यामुळे उन्हाळी पिकांचे व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केल्यानंतर पंचनामे झाले होते. त्याचा अहवाल शासनास पाठविला होता. त्यातच पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतीकामांना वेग येऊ लागला होता.

अनेक ठिकाणी मशागतीच्या कामे वेगात सुरू झाली होती. बुधवारी सकाळपासून ऊन पडले होते. सायंकाळपर्यंत उन्हाची तीव्रता कायम होती. मात्र, अधूनमधून ढगाळ वातावरण होऊ लागल्याने सायंकाळनंतर वातावरणात वेगाने बदल झाले. अचानक वादळी वारे वाहू लागल्याने तुरळक ठिकाणी झाडे पडझडीच्या घटना घडल्या असून, अनेक ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. तर तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. या पाऊस खरीप पेरण्यासाठी पोषक असल्याचे चर्चा शेतकरी वर्गामध्ये सुरू झाली आहे.

जिल्ह्यात शिरूर, बारामती, दौंड, पुरंदर तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. तर उर्वरित तालुक्यात कमी-अधिक सरी बरसल्या. तर हवेलीतील पुणे वेधशाळा, केशवनगर, कोथरूड, खडकवासला, थेऊर, खेड, भोसरी, चिंचवड, कळस, मुळशीतील पौड, घोटावडे, थेरगाव, माले, मुठे, पिरंगुट, कासार आंबोली, सावरगाव, कोळवण, मान, भोरमधील वेळू, आंबवडे, निरगुडसर, मावळमधील तळेगाव, काले, कार्ला, खडकाळा,

लोणावळा, शिवणे, परंदवाडी, ताकवे, वाडेश्वर, कुसगाव, टाकवे, वेल्ह्यातील पानशेत, जुन्नरमधील नारायणगाव, वडगाव आनंद, निमगाव सावा, बेल्हा, राजूर, डिंगोरे, आपटाळे, ओतूर, वडज, ओझर खेडमधील वाडा, राजगुरुनगर, कुडे, पाईट, चाकण, आळंदी, पिंपळगाव, कन्हेरसर, कडुस, वेताळे, करंजविहीरे,

आंबेगावमधील घोडेगाव, आंबेगाव, कळंब, पारगाव, मंचर, निरगुडसर, शिरूरमधील टाकळी, तळेगाव, रांजणगाव, पाबळ, बारामतीतील उंडवडी, इंदापुरातील लोणी, बावडा, काटी, निमगाव, अंथुर्णी, सणसर, पळसदेव, लाखेवाडी, दौंडमधील देऊळगाव येथे पावसाचा शिडकावा झाला.

गुरुवारी (ता.१२) सकाळी आठ वाजेपर्यंत मंडळनिहाय झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

वडगाव ५६, न्हावरा ५६, मलठण १३, कोरेगाव १३, शिरूर १८, निमोणे ५६, उरुळीकांचन २२, हडपसर १६, वाघोली १५, अष्टापूर १५, भोर २०, भोलावडे १३, नसरापूर १३, किकवी १९, संगमनेर २०, हर्नास २०, विंझर २२, आंबवणे २३, माळेगाव १८, पणदरे १०, वडगाव १४, लोणी १३, सुपा १४, मोरगाव १४, शिर्सुफळ १९, भिगवण २५, पाटस १९, यवत २९, कडेगाव ३०, राहू २५, वरवंड १९, रावणगाव १९, दौंड १७, बोरीबदक २२, खामगाव २५, वडगाव बांदे १५, पारगाव ५६, बोरी पार्धी २९, गिरीम १९, कुरकुंभ १९, सासवड १६, भिवंडी १३, कुंभारवळण २४, जेजुरी २४, परिंचे २१, राजेवाडी २२, शिवरी १३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Free Utensils Scheme: बांधकाम कामगारांसाठी खास कल्याणकारी योजना; मिळणार मोफत गृहउपयोगी वस्तू

Plastic Flower Ban : कृत्रिम फुलांवर बंदीबाबत निर्णयाची अंमलबजावणी कधी?

Flood Crop Damage : पिकांसोबत मातीही गेली वाहून

Nimboli Ark: निंबोळी अर्क घरच्या घरी कसा तयार करायचा? निंबोळी अर्काचे फायदे काय ?

Agrowon Podcast: हळदीच्या दरावरील दबाव कायम, गवारला उठाव कायम, शेवगा महागले; काकडी आवक वाढली, लसूणचे भाव स्थिर

SCROLL FOR NEXT