Rain Crop Loss : चौथ्या दिवशीही वादळी वारे, पावसाचा तडाखा

Unseasonal Rain Crop Damage : सलग चौथ्या दिवशी सुरगाणा, दिंडोरी, निफाड, नाशिक, इगतपुरी, नांदगाव, मालेगाव या तालुक्यांत नुकसान समोर आले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Nashik News : गुरुवारी (ता. ८) जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे ७३ गावांमध्ये १४७.१० हेक्टर क्षेत्रावर ७९१ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने दिला आहे. यात कांदा, डाळिंब, आंब्यासह भाजीपाला पिकांचे नुकसान आहे. यात पश्चिम पट्ट्यातील सुरगाणा तालुक्यात नुकसान अधिक आहे. सलग चौथ्या दिवशी पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढविल्या आहेत.

जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पाऊस, गारपीट पाऊस शेतकऱ्यांसमोर अडचणी वाढविणारा ठरला आहे. सलग चौथ्या दिवशी सुरगाणा, दिंडोरी, निफाड, नाशिक, इगतपुरी, नांदगाव, मालेगाव या तालुक्यांत नुकसान समोर आले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब पडल्याने ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित झाल्याने काही वाड्या वस्त्या अंधारात होत्या.

मालेगाव तालुक्यातील वडनेर अजंग, कळवाडी या महसूल मंडलात पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी कांदा काढणी सुरू होती. पावसामुळे शिवारात पाणी साचल्याने कांदा भिजला. अगोदरच वाढलेले तापमान व त्यात पाऊस यामुळे कांद्याची प्रतवारी घसरण्याची तसेच कांदा सड होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. सटाणा तालुक्यातील टेंबे खालचे, नामपूर महसूल मंडलात पावसाचा जोर दिसून आला. इतर भागात हलक्या सरी पडल्या.

Crop Damage
Unseasonal Rain: वाडेगाव परिसरात वादळामुळे फळबागांसह पिकांचे नुकसान

नांदगाव तालुक्यातील केळी बागांचे नुकसान समोर आले आहे. पूर्व भागातील आमोदे, बोराळे या गावामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. परिणामी बोराळे शिवारातील उन्हाळी बाजरी, पपई, केळी, मका, कांदा भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यासह केळी व डाळिंब बागांचे मोठे नुकसान आहे. अमोदे येथे डाळिंबाच्या बागेतील क्रॉप कव्हर पावसामुळे फाटल्याने झाडांचे मोठे नुकसान आहे. सिन्नर तालुक्यातील दुबेरे परिसरात मध्यम ते हलका पाऊस पडला.

Crop Damage
Jalgaon Unseasonal Rain: पाऊस, गारपिटीमुळे पीकहानी वाढली

चांदवड, दिंडोरी व निफाड तालुक्यांतील पावसामुळे पुन्हा सुरू झालेली कांदा काढणीची कामे विस्कळीत झाली. तर काही ठिकाणी कांदा भिजला. दुपारनंतर अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली. चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी ऊन सावलीचा खेळ सुरू आहे. मात्र या पावसामुळे तापमानात घट झाली. मात्र नुकसान वाढल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

पीकनिहाय नुकसान असे

पीक नुकसान क्षेत्र (हेक्टर)

कांदा ५३

टोमॅटो ०.२०

भाजीपाला ३.९०

आंबा ८८.४०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com