Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : खानदेशात काही भागांत जोरदार; अनेक मंडलांत तुरळक पाऊस

Rain News : खानदेशात मागील तीन दिवस तुरळक व मध्यम पाऊस अनेक भागांत झाला आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मागील तीन दिवस तुरळक व मध्यम पाऊस अनेक भागांत झाला आहे. शुक्रवारी (ता. ५) दुपारी व सायंकाळी काही भागांत चांगला पाऊस झाला. तर अनेक भागांत तुरळक सरी कोसळल्या.

गुरुवारी (ता.४) व शुक्रवारी कुठेही अतिवृष्टी किंवा अतिजोरदार पाऊस झालेला नसल्याची माहिती आहे. ऊन - सावली अशी स्थिती आहे. पावसाने तळोदा, शहादा व अन्य काळ्या कसदार जमिनीच्या क्षेत्रात पेरण्या रखडल्या आहेत.

खानदेशात मागील २४ तासांत ११ मंडलांत चांगला पाऊस झाला आहे. अन्यत्र हलका ते तुरळक पाऊस झाला आहे. शुक्रवारी जळगाव, धरणगाव, चोपडा, यावल, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील तळोदा व शहादा भागांत चांगला पाऊस झाला.

जळगाव जिल्ह्यात पाचोरा व भडगावातील काही मंडलांत रोज चांगला पाऊस हजेरी लावत आहे. या भागातील पाऊसमान चांगले आहे. त्यात भडगातील कोळगाव व पाचोरा भागातील पाचोरा मंडलांत चांगला पाऊस झाला आहे. पाचोरा मंडलात गुरुवारी २५ मिलिमीटर पाऊस झाला होता. तर कोळगाव मंडलात सुमारे ३९ मिलिमीटर पाऊस झाला होता.

सततच्या पावसाने काही भागात आनंद आहे. कारण पेरण्या पूर्ण झालेल्या असून, त्यावर पावसाची गरज आहे. मुरमाड, हलक्या जमिनीत रोज पाऊस आल्यास फारसे नुकसान होत नाही. परंतु काळ्या कसदार जमिनीतील वाफसा नाहीसा झाला आहे. सखल भागात पाणी साचत असल्याने कापूस व अन्य पिके पिवळी पडत आहेत. वाफसा नसल्याने तणनियंत्रण, पेरणी, फवारणी आदी कामे रखडली आहेत.

अनेक प्रकल्प कोरडे

पावसामुळे अनेक प्रकल्प कोरडे आहेत. परंतु तापी नदीत प्रवाही पाणी आहे. अन्य नद्यांचे पात्र मात्र प्रवाही नाही. काही नद्यांत प्रवाही पाणी होते. परंतु जोरदार पाऊस सतत नसल्याने नद्यांना अद्याप पूर आलेला नसल्याची स्थिती आहे.

पिके अंकुरली

पावसाने आंतरमशागतही अनेक काळ्या कसदार क्षेत्रांत झालेली नाही. परंतु पेरणीला लाभ झाला आहे. पेरणी वाया गेल्याचे प्रकार काही भागातच झाले आहेत. उडीद, मूग, तूर, कापूस, मका, सोयाबीन, ज्वारी आदींची पेरणी वेळेत व बऱ्यापैकी झाली आहे. या आठवड्यात पेरणी ९५ टक्क्यांवर होईल, असे दिसत आहे. पेरणीनंतर पाऊस आल्याने पिकेही अंकुरली आहेत.

२४ तासांतील पाऊस (मिलिमीटरमध्ये)

जळगाव - १२, चोपडा ९, भडगाव १४, पाचोरा १५. धुळे - ८, शिरपूर ११. नंदुरबार - ४, तळोदा १२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 344.74 कोटीं निधी वळवला

Silkworm Monsoon Care: पावसाळ्यात रेशीम अळी संगोपन करताना घ्यावयाची काळजी

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड : मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक सक्षमीकरण

Monsoon Parasite Control: पावसाळ्यातील परजीवी कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

SCROLL FOR NEXT