Kolhapur Rain Update : कोल्हापुरातील २८ बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला

Radhanagari dam : कोल्हापूर जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पाऊस सुरू आहे. राधानगरी आणि काळम्मावाडी (दुधगंगा) धरणातील पाणीसाठा वाढत आहे.
Kolhapur Rain Update
Kolhapur Rain Updateagrowon
Published on
Updated on

Panchaganga River Water : कोल्हापूर जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पाऊस सुरू आहे. राधानगरी आणि काळम्मावाडी (दुधगंगा) धरणातील पाणीसाठा वाढत आहे. काल(ता.०६) रात्री दोन वाजता चंदगड येथील जांबरे प्रकल्प शंभर टक्के भरला असून, सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. राधानगरी धरणातून १२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. २८ बंधारे पाण्याखाली आहेत.

शाहूवाडी तालुक्यातील मानोली, कांडवण, उखळू, पावणखिंड, केर्ली येथील धरण व धबधबे परिसरात वर्षा पर्यटनास जाण्यास तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी बंदी जाहीर केली. सर्व ठिकाणी पोलिस बंदोबस्तही ठेवला आहे.

संततधार पावसामुळे तालुक्यातील धरण, नद्या, ओढे यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. अशावेळी दुर्घटना घडून जीवितहानी होऊ नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. तालुक्यातील पर्यटनस्थळावर पर्यटक मोठ्या प्रमाणावर जातात.

पावणखिंड येथे तर ४० ते ५० फूट खोल दरी आहे. तेथे कोणी उतरू नये. यांसह या सर्वच ठिकाणांवर दुर्घटना घडू नये म्हणून प्रवेशबंदी घातली आहे. पावसाळ्यातील वाढते धोके लक्षात घेऊन आता तहसीलदार चव्हाण यांनी तालुक्यातील धरण व धबधबे परिसरात शाळांना पर्यटन सहली काढण्‍यासह बंदी घातली आहे.

Kolhapur Rain Update
Landslides In Kolhapur : भूस्खलनाचा धोका! कोल्हापुरातील अनेक गावांना सूचना

पाण्याखाली असणारे बंधारे

पंचगंगा नदी : शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, इचलकरंजी, शिरोळ. वारणा नदी - चिंचोली. भोगावती नदी - हळदी, राशिवडे, सरकारी कोगे. कासारी नदी - यवलूज, पुनाळ, तिरपण, ठाणे, आळवे, वालोली. घटप्रभा नदी - पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगाव, कानडे-सावर्डे, अडकूर, कानडेवाडी, तारेवाडी. हिरण्यकेशी नदी - साळगाव. ताम्रपर्णी नदी- कुर्तनवाडी, हल्लारवाडी, काकरे, माणगाव. दूधगंगा नदी - दत्तवाड असे २८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

प्रमुख धरणांमध्ये साठा टीएमसीमध्ये

राधानगरी ०३.१८ टीएमसी (३८.१ टक्के),

काळम्मावाडी ०६.७५ टीएमसी (२६.५९ टक्के)

तुळशी ०१.५३ टीएमसी (४४.०९ टक्के)

वारणा १४.१३ टीएमसी (४१.०९ टक्के)

पाटगाव ०१.९२ टीएमसी (५१.५७ टक्के)

आंबेओहोळ ००. ९३ टीएमसी (७५.०७ टक्के)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com