Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain : नगर जिल्ह्यात दमदार पाऊस

Rain Update : चांगल्या पावसाने शेतकऱ्यांचा समाधान असून या आठवड्यात पेरण्या, कापूस लागवडीला सुरुवात होण्याचा अंदाज आहे.

Team Agrowon

Nagar News : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली असून बहुतांश भागात दमदार पाऊस झाला. शनिवारी (ता. ८) रात्रभर संततधार पाऊस सुरू होता. जिल्ह्यात १६ महसुल मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. चांगल्या पावसाने शेतकऱ्यांचा समाधान असून या आठवड्यात पेरण्या, कापूस लागवडीला सुरुवात होण्याचा अंदाज आहे. अकोले तालुक्यात मात्र अजूनही अपेक्षित पाऊस नाही.

जिल्ह्यातील नेवासा, नगर, पाथर्डी, जामखेड, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा, पारनेर, राहुरी, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर तालुक्यांतील बहुतांश भागात चार दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहेत. शनिवारी दुपारनंतर तसेच रात्रभर अनेक भागात संततधार पाऊस सुरू होता. नेवासा तालुक्यात अनेक गावांत वादळाने पत्र्याचे शेड, विजेचे खांब, कांदा चाळीचे नुकसान झाले. सोनई व नेवासे येथील आठवडे बाजाराची चांगलीच दाणादाण उडाली.

सोनई, घोडेगाव, खरवंडी, वडाळा, माका, चांदे परिसरासह मुळाथडी, नेवासे शहर, बेलपिंपळगाव, प्रवरासंगम, सुरेगाव आदी भागांत जोरदार पाऊस झाला. श्रीरामपूर तालुक्यातील खोकर, भोकर, टाकळीभान, कमलापूर, भामाठण, खानापूर, गुजरवाडी, खिर्डी, वांगी, कारेगाव, मातापूर, मालुंजा, बेलापूर, पढेगाव, खंडाळासह गोदापट्टा व प्रवरा पट्ट्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली.

पाथर्डी तालुक्यात सर्वदूर भागात समाधानकारक पाऊस झाला. या पावसामुळे अनेक भागात सुरु असलेले अनेक गावातील टँकर बंद होण्याची शक्यता निर्माण झाली. पाथर्डी तालुक्यात झालेल्या पावसात वीज कोसळून औरंगपूर येथील राजेंद्र रामनाथ किलबिले यांच्या मालकीच्या दोन म्हशी ठार झाल्या आहेत. तसेच आंबा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जामखेड व अन्य भागातही चांगला पाऊस झाला.

तालुकानिहाय अतिवृष्टी झालेली मंडले (मिलिमीटरमध्ये)

पारनेर ः सुपा ८१, वाडेगव्हाण १०७. (ता. पारनेर) बेलवंडी ६६, देवदैठण ७२, कोळगाव ११२. श्रीगोंदा ः राशीन ८८. कर्जत ः शेवगाव ७४, ढोरजळगाव ६९. शेवगाव ः पाथर्डी ६६, कोरडगाव ११०, करंजी ११२, मिरी ६७. पाथर्डी ः सलाबतपूर १००, वडाळा ७३. नेवासा ः बेलापूर ६८, श्रीरामपूर ४८.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT