Rain Update : कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस

Rain News : कोकण, मध्य महाराष्ट्रातील अर्ध्या भागात मॉन्सून व्यापल्यानंतर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे.
Rain Update
Rain Update Agrowon

Pune News : कोकण, मध्य महाराष्ट्रातील अर्ध्या भागात मॉन्सून व्यापल्यानंतर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश पाऊस झाला. तर कुडाळमध्ये सर्वाधिक १९७.३ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. या पावसामुळे कोकणात भात रोपवाटिका, तर मध्य महाराष्ट्रात खरीप पेरण्यांना सुरुवात करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोकण, महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक आहे. अनेक ठिकाणी शंभर मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला. तर आंबोली येथे १७६.५, मसुरे १६९.३, सावंतवाडी १६४.८, बांदा १६४.८ सर्वाधिक पाऊस पडला. तर ठाणे, पालघर जिल्ह्यांत पावसाचा जोर काहीसा कमी होता. परंतु झालेल्या पावसामुळे खरीप कामांना वेगात सुरुवात झाली आहे.

Rain Update
Rain Update : सोलापूर जिल्ह्यात ‘मॅान्सून’ची सर्वदूर हजेरी

मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नगर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक होता. शनिवारी (ता.८) सायंकाळी पाचच्या सुमारास मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. या सर्व जिल्ह्यात सर्वदूर वादळीवारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. बारामती, सणसर आणि पुणे शहरांत अक्षरशः ढगफुटीसदृश पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यांत पावसाचा जोर कमी होता. तर खानदेशातील अनेक भागात पावसाची अजूनही प्रतीक्षा लागून आहे.

मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशीव, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसाच्या हलक्या सरी पडल्या. अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली असून, ढगाळ वातावरणाची स्थिती कायम होती. मात्र, मागील दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे.

अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांच्या पेरणीसाठी बियाणे, खतांची खरेदी केली आहे. विदर्भातील यवतमाळ, नागपूर, भंडारा या जिल्ह्यांत पावसाच्या तुरळक सरी पडल्या असून, अनेक ठिकाणी पावसाची अजूनही प्रतीक्षा लागून आहे. काही ठिकाणी ऊन पडल्याची स्थिती होती.

येथे १०० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद :

पिंगुळी १४९.३, पावस १४८.८, वेंगुर्ला १४२.५, म्हापण १४३.३, वेतोरे १४६.५, पेंडूर १४०.८, देवगड १३५.८, आंबलो १३७, कसाल १११.५, वालावल १२०.३, पाटगाव ११५.५, बापर्डे १२७, नाटे १२३, साटवली १२३, महाड १०३, खारवली १०३, तुडली १०३, बारामती, सणसर १०९.३, पुणे शहर १०५, कुंभवडे १०६.८, नांदगाव १०८, वाठार-किरोली १०२, चरण ११३.३,

मंडलांची सुधारित नावे :

कोकण : अलिबाग ८८.३, किहीम ७२.८, चरी ७४.३, चौल ६८.५, करंजवडी ८०.५, नाटे ९१.३, असुर्डे ७३.५, कळकवणे ८८.८, हेदवी ६०, रत्नागिरी ९२.५, फसोप ९२.५,

मालगुंड ८१.५, टरवल ८६.३, कडवी ७४.३, मुरडव ७३.५, माखजन ६९.५, फणसवणे ७४.३, देवळे ६६.८, देवरुख ६२, तेर्ये ७४.३, राजापूर ८४.३, सौंदळ ६१.३,

कोंडये ८०.३, जैतापूर ७१.३, ओणी ६३.३, पडेल ७२.३, मीठबाव ७६.८, शिरगाव ९२.०, मालवण ८५.८, श्रावण ९७, आचरा ९०, आबेरी ८८.८, पोइप ६८.८, मडूरा ७९.५,

शिरोडा ७५, कणकवली ८७.३, फोंडा ६८.०, सांगवे ९०.३, तळेरे ८६.८, कडावल ९८.८, माणगाव ९४.८, वैभववाडी ७८.५, तळकट ६४.८, भेडशी ६३.५.

Rain Update
Rain Update : पुण्यात ढगफुटीसदृष्य! राज्यात आनंदाच्या मॉन्सून सरी

मध्य महाराष्ट्र : श्रीगोंदा ५२.५, पेंडगाव ७१, कर्जत ५९, राशीन ७४.८, भांबोरा ८२.५, खडकवासला ९१.३, थेऊर ७१, वाघोली ६२.८, नसरापूर ८२.०, किकवी ८६.८,

आंबवणे ८३.८, न्हावरा ६७.५, उंडवडी ६१.५, भिगवण ८७.३, इंदापूर ५९.३, काटी ६३, निमगाव ६५, रावणगाव ७०.३, दौंड ६९.३, बोरी बुद्रुक ४३.८, खामगाव ४८.८,

वडगाव बांदे ४६.५, पारगाव ६७.५, मुस्ती ८८.८, टाकळी ५९.८,

पेनूर ६६.५, हातीद ८४.८, सदाशिवनगर ५९, दहिगाव ६०.३, नातेपुते ७९.३, पिलीव ६७.८,

आंधळगाव ७०.८, मारापूर ७०.८, नागठाणे ९२, आंबवडे ८९.८, तासगाव ७०, अपशिंगे ८९, केळघर ६५.८, मसूर ७३, उंडाळे ५९.३, काले ७८, रहिमतपूर ७१.८,

शिरंबे ६७.८, वाठार-स्टेशन ६६.८, औंध ७४, वडूज ९३, कातरखटाव ८१.३, दहिवडी ७०, मलवडी ७२.८, गोंदावले ७८.३, कुक्‍कुडवाड ६९, मार्डी, शिंगणापूर ६३,

फलटण ७९, आसू ६४, बरड ८०.५, राजाळे ६३.३, खंडाळा ६०.३, जत ९७.३, कोरेगाव ६१.३, तांदूळवाडी ६३.५, कासेगाव ७८, मांजर्डे ५९.३, शिरशी ९१.८,

दिघंची ६४.५, आटपाडी ९१.३, कडेगाव ६९.८, शाळगाव ५८.८, हेर्ले ९६.३, हुपरी ७८.८, रुई ८५.८, कागल ६४.३, खडकेवाडा ६७, गडहिंग्लज ६२.८, कडेगाव ६२.८,

मराठवाडा : पाटोदा ४१.५, टाकलसिंघ ४५.८, तेर्ला ३१.५, नितरूड ३३.५, रेणापूर ३७.८, पानगाव ३६.३, पळशी ३३.३, धाराशिव शहर ४३.३, कासेगाव ३१.५,

तुळजापूर ३२.३, सालगारा ५९.५, इतकल ३५, नळदुर्ग ५९.८, वालवड ३२.५, मुरूम ३२.३, माकणी ३३.८, जवळा बाजार ३७.३,

विदर्भ : धामनगाव २७.८, वेनी २६, कासोळा ५०.५, बोरी २१.५, गोरेगाव २९.८, कुरोडी ३९.५,

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com