Rain Update : सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस

Rain News : मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचले. दरम्यान, रविवार सकाळपासून जिल्ह्यात पावसाचे वातावरण आहे. काही ठिकाणी हलक्या सरी पडत आहेत.
Rain Update
Rain Update Agrowon
Published on
Updated on

Sindhudurg News : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, शनिवारी (ता. ८) रात्री मुसळधार पावसाने जिल्ह्याच्या बहुतांशी भागाला झोडपून काढले. कुडाळ, सावंतवाडी, देवगड, मालवण तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. दरम्यान, रविवारी (ता.९) सकाळपसून पावसाच्या हलक्या सरी सुरू आहेत.

जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यापसून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कुडाळ, सावंतवाडी, देवगड आणि मालवण या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. याशिवाय इतर भागांमध्ये देखील मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पहाटेपर्यंत जोरदार पाऊस सुरू होता. मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचले. दरम्यान, रविवार सकाळपासून जिल्ह्यात पावसाचे वातावरण आहे. काही ठिकाणी हलक्या सरी पडत आहेत.

Rain Update
Rain Update : सोलापूर जिल्ह्यात ‘मॅान्सून’ची सर्वदूर हजेरी

जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद कुडाळ तालुक्यात १८७ मिमी इतकी झाली आहे. मालवण- १५२ मिमी, सावंतवाडी १४३ मिमी, देवगड १५८ मिमी, कणकवली ९८ मिमी, वैभववाडी ८८ मिमी, तर दोडामार्ग तालुक्यात ३० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाऊस

छत्रपती संभाजीनगर ः जिल्ह्यात रविवारी (ता.९) दुपारनंतर अनेक ठिकाणी पावसाला जोरदार सुरुवात झाली. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास पैठण तालुक्यातील ढोरकीन येथे पावसाची रिपरिप सुरू झाली. लोहगाव भागातही पावसाचे दमदार आगमन झाले. कायगाव परिसरात पाऊस झाला.

पैठण तालुक्यातील कडेठाण, ब्राह्मणगाव, पारुंडी, बालानगर परिसरात जोरदार पाऊस सुरू होता. गंगापूर तालुक्यातील कायगावला घटेश्‍वर मंदिर परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू होता. चित्तेपिंपळगाव परिसरात पावसाला सुरुवात झाली. रजापूर (ता. पैठण) येथे जोरदार पावसाला सुरुवात झाली होती.

रत्नागिरी : हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात शनिवारी (ता. ८) सायंकाळपासून मुसळधार पाऊस झाला. मात्र रविवारी (ता. ९) सकाळी पावसाचा जोर ओसरला. पावसामुळे बळीराजा सुखावला असून, भातशेतीच्या कामांना लवकरच आरंभ होणार आहे. पावसाचा जोर १२ जूनपर्यंत राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Rain Update
Rain Update : पुण्यात ढगफुटीसदृष्य! राज्यात आनंदाच्या मॉन्सून सरी

गेले दोन दिवस जिल्ह्यांत पावसाचे वातावरण होते. मोसमी पावसाचे आगमन संथ गतीने झाले. शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र सायंकाळी हलके वारे वाहू लागले आणि पावसाला सुरुवात झाली. रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर साखरपा येथे पावसाचे पाणी घरांच्या अंगणापर्यंत शिरले होते.

संगमेश्‍वर तालुक्याला शनिवारी चांगलेच झोडपले. देवरूख खालची आळी येथे रांताबी वृक्ष कोसळल्याने वीजवाहक तारा खाली आल्या. हा प्रकार लक्षात येताच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. राजापूर तालुक्यात मिठगवाणे येथील जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंत कोसळून नुकसान झाले. पावसामुळे विजेचा लपंडाव सुरू झाल्याने नागरिक त्रस्त झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com