Heavy Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Marathwada Rain : मराठवाड्यात धो-धो पावसाने शेतशिवार जलमय

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासापर्यंत सर्व दूर पाणीच पाणी झाले. तब्बल २८४ मंडलांत अतिवृष्टी झाली. जालना, परभणी, हिंगोली या तीनही जिल्ह्यामध्ये सरासरी १०७ ते १३८ मिलिमीटर दरम्यान पाऊस पडला. छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यांमध्ये सरासरी ५६ ते ९१ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. त्यामुळे नदी नाले खळखळून वाहिले शेत शिवारात पाणीच पाणी झाले.

गत काही दिवसांपासून मराठवाड्यात पावसाने जोर पकडला असे वाटत असताना मध्यंतरी पुन्हा दडी मारली होती. रविवारी (ता. १) मात्र पावसाने मराठवाड्यात सर्वदूर कमी अधिक प्रमाणात जोरदार हजेरी लावणे सुरू केले. सोमवारी (ता. २) सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासात मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात सर्वाधिक सरासरी १३८.४ मिलिमीटर पाऊस झाला.

त्यापाठोपाठ हिंगोली जिल्ह्यात सरासरी १३४.३, जालन्यात सरासरी १०७.३, बीडमध्ये ९१.८, नांदेडमध्ये ७४.१, छत्रपती संभाजीनगरमध्ये ६८.३, लातूरमध्ये ६६.७ तर धाराशिवमध्ये सरासरी ५६.५ मिलिमीटर पाऊस झाला. अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश झालेल्या पावसामुळे शेत शिवार जलमय झाली.

अनेक ठिकाणी पीक पाण्याखाली गेली. काही गाव शिवारात घरांची पडझड झाली. पुलावरून पाणी असल्याने वा काही पर्यायी मार्गावरील तात्पुरते पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प होऊन संपर्क तुटला होता. सोमवारी दुपारपर्यंत अपवाद वगळता अनेक भागात राहून राहून पावसाची संततधार सुरूच होती.

जिल्हानिहाय अतिवृष्टीची मंडल (पाऊस मिलिमीटरमध्ये)

छत्रपती संभाजीनगर जिल्हा

उस्मानपुरा ७०.५०, भावसिंगपुरा ७३.२५, कांचनवाडी ८२, चिकलठाण ६७, चित्तेपिंपळगाव ८०.५०, करमाड ९०.७५, लाडसावंगी १९.२५, हरसुल ७९.५०, कचनेर ७०.२५, पंढरपूर ८२, पिसादेवी ७४, शेकटा ६७.७५, वरुडकाजी ७४, पिंपळवाडी ८५.७५, बालानगर ९४.२५, नांदर १४९.७५, लोहगाव ८४.५०, ढोरकीन ७९.७५, बिडकीन ९१.७५, पैठण ८४, पाचोड १९०.२५, विहामांडवा १६५.७५, आपेगाव ९०, निलजगाव ९१.७५, शेंदूरवादा ९६.२५, तूर्काबाद ९५.७५, वाळूज ८४.५०, आसेगाव ७१.७५, नाचनवेल ७२.७५, चिंचोली ७४, करंजखेड ७४, वेरूळ ८१.७५, सिल्लोड ७८, निल्लोड १०९. २५, भराडी ८२.२५, गोळेगाव ९४.२५, अजिंठा ८५.२५, आमठाणा ७२.७५, बोरगाव ७२.७५, अंभई १८२.५०, पालोद ९३.७५, शिवना ९३, उंडणगाव ९४.२५, फुलंब्री ८५.७५, आळंद ९२.७५, पीरबावडा ८६.५०, वडोद बाजार १०५.७५.

जालना जिल्हा

भोकरदन ८७.७५, अनवा ८९.५०, हसनाबाद ९२.७५, माहोरा ७३.२५, जालना ग्रामीण १५०.५०, नेर १२०.२५, विरेगाव १३७.७५, पाचनवडगाव ८७.२५, अंबड १९४.७५, धनगर पिंपरी १५१, जामखेड १७५.७५, रोहिलागड १५८.५०, गोंदी २३१.५०, वडीगोद्री २५७.७५, सुखापुरी २३३.७५, आष्टी १२७.५०, सातोना १३४.२५, शेळगाव ७१, दाभाडी ८१.५०, घनसावंगी २८०.७५, राणी उचेगाव २५१.७५, तीर्थपुरी २६९, कुंभार पिंपळगाव २५९.२५, अंतरवली १०७, रांजणी ९२.७५, जाम समर्थ १६७.२५, तळणी १०७ ,ढोकसाळ १३०.५० ,पांगरी १२०.२५.

बीड जिल्हा

बीड ११९.५०, पाली १०३.७५, म्हालसा जवळा १३०.२५, नाळवंडी १०८, राजुरी ८०.७५, पिंपळनेर ११२.२५, पेंडगाव ११६.७५, मांजरसुभा ७०, चौसाळा ७५.७५, नेकनूर ७२.७५, लिंबागणेश ६६.५०, येळंबाघाट ६९.७५, चऱ्हाटा ८०.७५, पारगाव सिरस ८०.७५, कुरळा १३०.२५, दासखेड ६६.५०, गेवराई १२४, मादळमोही ११६.२५, जातेगाव १४०.५०, पाचेगाव ९१.२५, धोंडराई १४७.५०, उमापूर १३१, चकलांबा ९०, सिरसदेवी ११८, रेवकी १७१.५०, तलवाडा १३०.२५, माजलगाव १०६, गंगामसला १७१, किट्टी आडगाव १३५, तालखेड १३३.७५, नित्रुड ९७.५०, दिंद्रुड १२७.५०, अंबाजोगाई ८१.२५, पाटोदा ७८.५०, लोखंडी सावरगाव ७२.२५, घाटनांदुर ८२.२५, बर्दापूर ८५, राडी १२०, केज ११३, युसूफ वडगाव १०७.५०, होळ ११३.२५, विडा ८२, बनसारोळा १००.२५, नांदुरघाट ८२.७५, चिंचोली माळी ११६.५०, परळी १०५.५० ,नागापूर ११३, सीरसाळा १५५.२५, पिंपळगाव ११२.२५, धारूर १३२.५०, मोहखेड ९७.५०, तेलगाव ९७.५०, वडवणी १०५.७५, कवडगाव ११०, शिरूर ७८.२५, रायमोहा ८८.२५, तींतरवणी ८२.७५, ब्रह्मनाथ येळंब १०२.७५, गोमलवाडा ६७.७५, खालापुरी ८८.२५.

अतिवृष्टीने ६३ गावांत नुकसान

मराठवाड्यात सर्वदूर झालेल्या अतिवृष्टीत जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर या जिल्ह्यातील ६३ गावात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. या नैसर्गिक आपत्तीत चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये जालना, हिंगोली, बीड व लातूर जिल्ह्यातील प्रत्येकी एका जणांचा समावेश आहे. याशिवाय ८८ लहान मोठी दुधाळ व ओढकाम करणारी जनावरेही या आपत्तीत मृत्युमुखी पडली. २९ पक्क्या घरांची अंशतः पडझड झाली असून १३५ कच्च्या घरांची अंशतः पडझड झाली आहे. दोन गोठेही या नैसर्गिक आपत्तीत बाधित झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार जालना जिल्ह्यातील १२ गावातील ७४ शेतकऱ्यांच्या ४५.२० हेक्टर जिराईत शेतीचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

SCROLL FOR NEXT