Marathwada Rain : मराठवाड्याला पावसाने झोडपले

Rain Alert : गेल्या तीन दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस कोसळत आहे. रविवारी (ता. १) मराठवाड्याला पावसाने चांगलेच धुतले असून अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे.
Marathwada Rain
Marathwada Rain Agrowon
Published on
Updated on

Pune News : गेल्या तीन दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस कोसळत आहे. रविवारी (ता. १) मराठवाड्याला पावसाने चांगलेच धुतले असून अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. सोमवारी (ता. २) सकाळी आठ वाजेपर्यंत परभणीतील पाथरी मंडलात सर्वाधिक ३१४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. या पावसामुळे शेतातून पाणी वाहू लागल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले असून ओढे, नाले भरून वाहिले. नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. धरणांतील पाणी पातळीतही वाढ झाल्यामुळे धरणांतून विसर्ग सोडण्यात आला आहे.

मराठवाड्याला झोडपले :

मराठवाड्यातील जवळपास २८४ मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून तीन जिल्ह्यात सरासरी १०० मिलिमीटरच्या पुढे पाऊस झाला आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्व ३० मंडलांत अतिवृष्टी झाली. तर २ मंडलात २०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला, तर २६ मंडलात १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणातून विसर्ग सुरू असल्यामुळे पूर्णा नदीला पूर आला आहे. मुसळधार पावसामुळे जमीन खरडून गेली. डिग्रस कऱ्हाळे शिवारातील कपाशीचे पीक मुळासकट उपटून पडले असून हळद पिकाचे नुकसान झाले. तर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे सुरू करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिले.

परभणी जिल्ह्यातील ५२ पैकी ५० मंडलांत अतिवृष्टी झाली असून ३० मंडलांमध्ये १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. तर ५ मंडलांत २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. जिल्ह्यातील निवळी येथील करपरा मध्यम प्रकल्पाच्या सांडव्यावरुन पाणी वाहत आहे. परभणी गंगाखेड रस्त्यावरील दैठणा येथील इंद्रायणी नदीला पूर आला. दुधना नदीच्या पुरामुळे जिल्ह्यातील कोथाळा शिवारातील सोयाबीनचे पीक पाण्याखाली गेले. संभाजीनगरमधील गोदावरी नदी काठच्या अमळनेर, कायगाव, अगरवाडगाव, भिवधानोरा भागातील शेतात हे नदीचे नव्हे पावसाच्या पाण्याने शेतीपिके पाण्यात गेली आहेत. त्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकरी हवालदिल झाला.

अंबड तालुक्यातील आलमगाव -कर्जत परिसरातील शेतीशिवारातील ओढे, नाले, करंजी नाला तुडुंब भरून वाहत आहे. नांदेड जिल्ह्यात व विविध प्रकल्पाच्या परिसरामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे विष्णुपुरी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढला आहे. याशिवाय सिद्धेश्वर धरणातूनही मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. पाटंबधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार नांदेड येथील विष्णुपुरी धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहे. बीडमध्ये मागील चोवीस तासांपासून संततधार पाऊस सुरूच आहे. टाकरवण येथील तळ घरातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. नदी ओढ्यांना पाणी आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ओढ्याचे पाणी चोपड्याचीवाडी गावात शिरल्याने गाव जलमय झाले आहे. गोंदी परिसरात रविवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने डोरली नदी अशी दुथडी भरून वाहत आहे.

Marathwada Rain
September Rain Alert : राज्यात सप्टेंबर महिन्यातही चांगला पाऊस; मराठवाड्याच्या काही भागत जोर कमीच राहण्याची शक्यता: हवामान विभाग

नगर, जळगाव, सोलापुरात जोरदार सरी :

मध्य महाराष्ट्रातील नगर, सोलापूर जिल्ह्यांत पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. या भागात मागील काही दिवसापासून चांगलीच उघडीप होती. परंतु नगरमधील शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथे सर्वाधिक १०० मिलिमीटर पाऊस झाला. तर सोलापूरमधील नारी येथे ९६ मिलिमीटर पाऊस पडला. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी हलका पाऊस झाला. तर नाशिकमधील जातेगाव, नायडुंगरी येथेही तुरळक सरी बरसल्या. खानदेशातील धुळे जिल्ह्यातील शिरपूर, बोराडी, होळनांथे, थाळनेर, सांगवी येथे हलका पाऊस झाला. जळगावमधील मुक्ताईनगर, तोंडापूर येथे १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला असून उर्वरित भागातही जोरदार पाऊस झाल्याने शेतात पाणीचपाणी झाले होते.

कोकणात तुरळक सरी :

कोकणात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. रत्नागिरीतील शिरगांव मंडलात अवघा ३४ मिलिमीटर पाऊस झाला. तर चिपळूण, खेर्डी, कळकवणे, कुळवंडी, धामणंद, सिंधुदुर्गमधील आजगाव, आबोली, मडूरा, कणकवली, फोंडा, सांगवे, कुडाळ, कडावल, कसाल, वालावल, भेडशी येथे तुरळक सरी पडल्या. या पावसामुळे पिकांना चांगलाच दिलासा मिळत आहे.

Marathwada Rain
Rain Prediction : नगर जिल्ह्यातील अनेक भागांत मंगळवारपर्यंत पावसाचा इशारा

सोमवारी (ता.२) सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यात झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये - (स्रोत : कृषी विभाग)

पश्चिम महाराष्ट्र : मुक्ताईनगर १०४, अंतुर्ली ५१, गोरगवळे ५३, चोपडा ४९, कासोदा, उत्राणगृह, जामनेर ४०, वाकडी ६२, फत्तेपूर ५५, मालदाभाडी ७१, तोंडापूर १०८, पिंपळगाव ५०, सोनवद ४४, नांदगाव ४०, खर्डा ५३, शेवगाव ९२, भातकुडगाव ७४, बोधेगाव ८३, ढोरजळगाव ७४, एरंडगाव ५७, पाथर्डी, माणिकदौंडी ६६, टाकळी ८१, कोरडगाव ६९, करंजी ८१, मिरी ६५, सलाबतपूर ६२, कुकाणा ६०, वैराग ५४, उपळाई ५९, पांगरी ७४, पानगाव ५४, सुर्डी ६७, खांडवी ५७, माढा ५०.

मराठवाडा : नांदर १४९, पाचोड १९०, विहामांडवा १६५, निल्लोड १०९, आंभाई १८२, वाडोदबाजार १०५, जालना ग्रामीण १५०, नेर १२०, विरेगाव १३७, अंबड १९४, धनगरपिंपरी १५१, जामखेड १७५, रोहिलागड १५८, आष्टी १२७, सातोणा १३४, कु. पिंपळगाव १५९, अंतरवळी १०७, जांबसमर्थ १६७, तळणी १०७, ढोकसळ १३०, पांगरी १२०, बीड ११९, पाडळी १०३, म्हाळसजावळा १३०, नळवंडी १०८, पिंपळनेर ११२, पेंडगाव ११६, गेवराई १२४, मडळमोही ११६, जातेगाव १४०, ढोणदराई १४७, उमापूर १३१, सिरसदेवी ११८, रेवकी १७१, तळवडा १३०, माजलगाव १०६, गांगामासळा १७१, कित्तीडगाव १३५, तालखेड १३३, दित्रूड १२७, केज ११३, युसूफ १०७, होळ ११३, बनसारोळा १००, परळी १०५, नागापूर ११३, सिरसाळा १५५, पिंपळगाव ११२, धारूर १३२, वाडवणी १०५, कावडगाव ११०, नळेगाव १०५, मोघा १६४, हेर १०४, देवणी १२७, कळंब १०३, इतकूर १५०, नांदेड शहर ११८, नांदेड ग्रामीण १२४, तुप्पा १२५, वसरणी १०३, विष्णुपुरी ११२, लिंबगाव १५४, तरोडा १४८, वाजेगाव १३५, नाळेश्वर ११२, बाऱ्हाळी १०२, लोहा १५७, माळाकोळी १०१, सोनखेड १५७, शेवडी ११४, कलंबर १५७, मनाठा ११२, तामसा १३२, पिंपरखेड १०२, मुदखेड १२९, मुगट १२५, बारड १३७, अर्धापूर १७०, दाभड १२६, मालेगाव १३५, परभणी शहर १०८, पेडगाव १४४, झरी १२०, टाकळी कुंभकर्ण ११८, गंगाखेड १०५, महातपुरी ११०, माखणी १०५, हदगाव १३७, कसापुरी १८९, जिंतूर १६९, सांगवी म्हा १७९, बामणी १७७, बोरी १३१, अदगाव १४८, चार्थना, वांगी धानोरा १६६, दुधगाव १२६, ताडकळस १०६, पालम ११९, पेठशिवणी १२२, सेलू १४८, देऊळगाव १९५, कुपता १४४, चिखलठाणा १८४, मारेगाव १६८, सोनपेठ १७१, आवळगाव १५६, शेळागाव १५६, कोल्हा १६७, ताडबोरगाव १५४, नरसी १५३, सिरसम १४९, डिग्रस कऱ्हाळे १८६, माळहिवरा १४९, खंबाळा १५९, कळमनुरी १५२, वाकोडी १५४, नांदापूर १६४, आखाडा बाळापूर १०६, डोंगरकड, वारंगा फाटा ११२, वसमत ११५, आंबा १३९, गिरगाव १५८, हट्टा ११०, टेंभुर्णी १०३, कुरुंदा १११, औंढा नागनाथ १४२, येहळेगाव १८६, साळणा १४५, जवळा बाजार ११९, सेनगाव १२४, साखरा १३३, पानकनेरगाव १३४, हत्ता १६९.

विदर्भ : दिग्रज, कळगाव, तिवरी, तूप ७३, पुसद १०३, गौळ ७१, शेंबळ १००, ब्राह्मणगाव ८८, जांब ८८, वरूड १०२, बोरी १०३, मुळवा ७१.

जायकवाडी तुडुंब होण्याच्या दिशेने

मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी प्रकल्पातील पाणीसाठा सोमवारी (ता. २) दुपारी बाराच्या सुमारास ८७.९६ टक्क्यांवर पोहोचला होता. सायंकाळी तो ९० टक्क्यांच्या पुढे जाण्याची आशा होती. त्यामुळे गतवर्षी निम्माही भरू न शिकलेल्या जायकवाडी प्रकल्पाची तुडुंब होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. १०२.७३ टीएमसी क्षमतेच्या या प्रकल्पात ६७.४३ टीएमसी उपयुक्त तर ९३.४९ टीएमसी एकूण पाणीसाठा झाला होता. प्रकल्पाला एकूण २७ दरवाजे आहेत. प्रकल्पातील पाण्याची आवक २१ हजार २८१ क्युसेकने सुरू होती. शिवाय प्रकल्पातून उजव्या कालव्यामधून माजलगाव प्रकल्पासाठी ६०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता.

अनेक ठिकाणी मुसळधार...

- कोकणात हलक्या सरी.

- खानदेशातील जळगाव जिल्ह्यात जोरदार पाऊस.

- नगर, सोलापूर, सांगलीत काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस.

- मराठवाड्यात सर्वदूर मुसळधार पाऊस.

- कापूस, सोयाबीन, तूर पिकांचे मोठे नुकसान.

- मराठवाड्यातील प्रकल्प भरले.

- विदर्भात वाशीम, यवतमाळमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस.

- जालन्यामधील घनसांगवी मंडलात २८० मिलिमीटर पाऊस.

परभणीतील पाथरी मंडलात सर्वाधिक ३१४ मिलिमीटरची नोंद

येथे पडला २०० मिलिमीटरहून अधिक पाऊस :

पाथरी ३१४, बाभळगाव २७७, गोंधी २३१, वाडीगोद्री २२७, सुखापुरी २२३, वालूर २४६, मानवत २५६, काकरजवळा २०७, रामपुरी २०३, हिंगोली २२५, बासंबा २२५, घनसांगवी २८०, तिर्थापूरी २६९,

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com