Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : देशाच्या अनेक भागांत पावसाचा धुमाकूळ

Rain News : पावसाने देशाच्या अनेक भागांमध्ये धुमाकूळ घातला आहे. आसाम राज्यातील पूरस्थिती कायम असली तरी त्यातून किंचित दिलासा मिळाला आहे.

Team Agrowon

New Delhi News : पावसाने देशाच्या अनेक भागांमध्ये धुमाकूळ घातला आहे. आसाम राज्यातील पूरस्थिती कायम असली तरी त्यातून किंचित दिलासा मिळाला आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थानमध्ये सोमवारी (ता. ८) अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.

आसाममधील पूरस्थितीने आतापर्यंत ६० जणांचा मृत्यू झाला आहे. अरुणाचल प्रदेशला देखील मुसळधार पावसाने झोडपले आहे. भूस्खलन तसेच पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. उत्तराखंडमध्ये नद्यांना पूर आला आहे.

हिमाचल प्रदेशात भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्गासह ७० हून अधिक रस्ते बंद केले आहेत. पुरामुळे काझिरंगा राष्ट्रीय उद्यानातील सुमारे १३१ वन्य प्राण्यांचा मृत्यू झाला. तर ९६ प्राण्यांची सुटका करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्राने आसामला सर्वतोपरी मदत करावी, असे आवाहन केले आहे.

आसाममध्ये पूरस्थितीत किंचित सुधारणा

गेल्या काही दिवसांपासून महापुराचा सामना करणाऱ्या आसाममध्ये पूर परिस्थितीत किंचित सुधारणा झाली आहे. राज्यातील पूरग्रस्तांची संख्या २४ लाखांवरून आता १८.८० लाखावर आली आहे. पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या धुब्री जिल्ह्यात अजूनही ४.७५ लाख जण पुरात अडकले आहेत.

आणखी सहा जणांचा मृत्यू झाल्याने या वर्षी पूर, भूस्खलन आणि वादळांमधील मृतांची संख्या ८५ वर गेली आहे. ब्रह्मपुत्रेसह अन्य प्रमुख नद्या अजूनही धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहेत. राज्यात एकूण ५४३ मदत छावण्यांत जवळपास साडेतीन लाख लोकांनी आश्रय घेतला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT