Monsoon Rain : पश्‍चिम विदर्भात मॉन्सून सक्रिय, खामगाव, बाळापुरांत अतिवृष्टी

Rain Update : पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांत बहुतांश तालुक्यांमध्‍ये गेल्या २४ तासांत पावसाने जोरदार हजेरी लावली.
Rain Update
Rain UpdateAgrowon

Akola News : पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांत बहुतांश तालुक्यांमध्‍ये गेल्या २४ तासांत पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली असून खामगाव तालुक्यातील आवार मंडलात विक्रमी २१९ मिलिमीटर पाऊस नोंदवण्यात आला. या जोरदार पावसाने नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. मोठ्या प्रमाणात या मंडलात नुकसानाची शक्यता वर्तवली जात आहे.

जूनमध्ये या विभागात कमी पाऊस झाल्याने चिंता वाढली होती. प्रामुख्याने पेरणी झालेले व पेरणी न झालेल्या क्षेत्रधारकांची झोप उडाली होती. उगवलेली पेरणी पावसाच्या खंडामुळे अडचणीत सापडल्या होत्या. तर हजारो हेक्टर जमीन अद्यापही नापेर असल्याने व पेरणीचा कालावधी वाढत असल्याने दुसरीकडे चिंता बनलेली होती. अशातच रविवारी (ता.७) या भागात पाऊस सक्रिय झाला.

Rain Update
Kolhapur Rain : पंचगंगा नदी पात्राबाहेर; ५१ बंधारे पाण्याखाली, अतिवृष्टीचा इशारा

अकोल्यातील बाळापूर, बुलडाण्यातील खामगाव तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. दोन्ही तालुक्यांत सरासरी ९० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. अकोला जिल्ह्यात जवळपास १० मंडलांमध्ये १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. यातील बहुतांश पाऊस खारपाण व कोरडवाहू पट्ट्यात पहिल्यांदाच एवढ्या प्रमाणात झाला.

यात अकोट तालुक्यात चोहोट्टा बाजार १०६ मिलिमीटर, कुटासा ३६.९, अकोलखेड ३६.३, तेल्हारा ४६.८, माळेगाव बाजार ५२.३, हिवरखेड ६०.८, पाथर्डी ४७, पंचगव्हाण ५३.५, बाळापूर ११८.८, पारस १११.५, व्याळा ११८.५, उरळ बुद्रूक १००.८, हातरूण ७९.३, अकोला ११०, दहिहांडा ८५.८, कापशी १००, शिवणी १६३, कौलखेड १४६, राजंदा ११९.५, पातूर ४६.५, बाभूळगाव ३६.९, आलेगाव ४३.३, सस्ती ३३, घुसर ४७.५, उगवा ६९.५, आगर ६९.८, बोरगाव मंजू ३२.८, सांगळूद ४७.५, बार्शीटाकळी ६२.३, महान ३८.५, धाबा ३८.५, खेर्डा बुद्रूक ५०, मूर्तिजापूर ५३.९ मिलिमीटर पाऊस नोंद झाला.

Rain Update
Maharashtra Rain : मराठवाडा, विदर्भात जोरदार पाऊस

खामगाव तालुक्यात अतिवृष्टी

बुलडाणा जिल्ह्यात खामगाव या तालुक्यात सर्वाधिक ९१ मिलिमीटर पाऊस झाला. याच तालुक्यातील आवार मंडलात तब्बल २१९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या तालुक्यात खामगाव ६५.८, पिंपळगाव राजा ६०.८, लाखनवाडा ८६.८, अटाळी ६८.८, पळशी बुद्रूक९३.३, अडगाव ६०.८, वझर ६१.८, पारखेड ५३.५, जनुना १३०.१, हिवरखेड १२५.५, काळेगाव १०४.५ मिलिमीटर पाऊस झाला. जळगाव ४८, जामोद ३३.५, घोडप ६१.३, पेठ ४९.५, अंजनी बुद्रूक ६१.३, कल्याणा ८३.३, शेगाव ५८.८,

जलंब ४५.८, मोताळा ७२.५, बोराखेडी १६८.३, धामणगाव बढे ७४.३, पिंपरी गवळी ७८.८, रोहिणखेड ७४.३, पिंपळगाव देवी ४५.५, शेलापूर बुद्रूक ७४, नांदुरा ४१, वडनेर ५९.३, शेंबा ८१.५, महाळुंगी ३९.३ पावसाची नोंद झाली.

वाशीम जिल्ह्यात पावसाचा तुलनेने जोर कमी असला तरी सर्वदूर पाऊस पडला. वाशीम मंडलात ३४.३, पार्डी टकमोर ६४.५, मालेगाव ६५.३, शिरपूर ३६.३, मुंगळा ५२, मेडशी ४३.३, करंजी ३०.८, जऊळका ३३, चांडस २३, आसेगाव ३७, पोटी २८.८, धानोरा खुर्द २६.५, कुपटा ३३, गिरोली ३५ मिलिमीटर पाऊस झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com