Rain  Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : मध्य महाराष्ट्र, खानदेशात जोरदार पाऊस

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Weather Update : पुणे : राज्यातील काही भागात पावसाचा जोर कमीअधिक होत आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. खानदेशात अनेक ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस पडला. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली आहे. बुधवारी (ता. २१) सकाळी आठ वाजेपर्यंत छत्रपती संभाजीनगरमधील पैठण तालुक्यातील आडूळ येथे सर्वाधिक ११२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यामुळे शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाने सुरुवात केली आहे. राज्याच्या विविध भागात पाऊस पडत आहे.

कोकणात पावसाचे प्रमाण कमी असले तरी ठाणे जिल्ह्यातील सरळगाव येथे ३८ मिलिमीटर, रायगडमधील मोराबी येथे ६५ मिलिमीटर, तर कर्जत ४८, कळंब ६७, चौक येथे ७० मिलिमीटर, रत्नागिरीतील शिरगांव येथे ६५ मिलिमीटर पाऊस झाला. सिंधुदुर्गमधील वैभववाडी येथे ४० मिलिमीटर पाऊस पडला असून पालघरमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसला. प्रामुख्याने मांडवी, निर्मल, मानिकपूर येथे ४४ मिलिमीटर, तर विरार ६१, कसा ३५, पालघर, सफला, अगरवाडी ३४, तलवड येथे ४७ मिलिमीटर पाऊस झाला. घाटमाथ्यावर पावसाने उघडीप दिली असून काही अंशी ढगाळ वातावरण होते.

मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर आणि कोल्हापूर जिल्ह्यांत बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. नाशिकमधील वाडीवऱ्हे येथे ९८ मिलिमीटर, उंबरठाणा येथे ८५ मिलिमीटर पाऊस झाला. नगरमधील साकूर येथे ८४ मिलिमीटर, चिंचोडी पाटील ७६, शेवगाव येथे ६५ मिलिमीटर, कोल्हापुरातील हुपरी येथे ७३ मिलिमीटर तर नांदणी येथे ६२ मिलिमीटर पाऊस पडला. खानदेशातील धुळे, जळगाव जिल्ह्यांत अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. धुळे दोन मंडलात मध्यम पाऊस पडला असून पिकांना दिलासा मिळाला. तर पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यांतही काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. सोलापुरात पावसाने विश्रांती घेतली होती. बुधवारी दुपारनंतर पुणे शहर व परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वदूर मध्यम ते जोरदार पाऊस झाला.

काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश पाऊस झाल्याने शेतात पाणी तुंबले होते. त्यामुळे ओढे, नाले प्रवाही झाले आहेत. जालन्यातील जामखेड येथे ४८ मिलिमीटर, रोशनगाव येथे ४० मिलिमीटर, बीडमधील ढवळवडगाव येथे ६१ मिलिमीटर, पिंपळा येथे ५१ मिलिमीटर पाऊस पडला असून लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसाची उघडीप होती. विदर्भातील बुलडाण्यातील चिखली येथे ६० मिलिमीटर तर घोडप, दाड येथे ३४ मिलिमीटर अकोल्यातील पिंजर येथे ३८ मिलिमीटर, तर हिवरखेड, खेर्डा, निंबा येथे २१ मिलिमीटर, वाशीममधील आसेगाव येथे ४४ मिलिमीटर, तर किन्हीराजा ३१, मेडशी ३०, शेलू बाजार येथे २१ मिलिमीटर, अमरावतीतील चिखलदरा येथे ४१ मिलिमीटर, वर्ध्यातील तळेगाव येथे ५८ मिलिमीटर पाऊस पडला असून अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोलीत ढगाळ वातावरण असून अधूनमधून ऊन पडत होते.


बुधवारी (ता.२१) सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यात झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत ः कृषी विभाग)
पश्चिम महाराष्ट्र : घोटी ४३, टाकेद ४४, धारगाव ५३, पेठ ४६, लासलगाव ३२, वडाळी ३२, बोरकुंड ३६, दहिवेल ५८, विसरवाडी, खांडबारा ५५, ब्रह्मपुरी, म्हसावद, रोशणमाळ, तोरणमाळ २९, खापर ३१, मोरांबा ३२, नसिराबाद ५६, चोपडा, चहार्डी ३२, चाळीसगाव ४८, कोळगाव ४२, वाळकी ३३, रुईछत्तीसी ३७, पारनेर ५५, मांडवगण ४१, कर्जत ५०, भातकुडगाव ३५, चापडगाव ५४, ब्राह्मणी ४८, आश्‍वी, पिंपरणे, समनापूर ५९, शिबलापूर ३०, अकोले ४२, साकीरवाडी, कोतूळ, ब्राह्मणवाडा, राजूर ३३, शेंडी ४४, कार्ला ४१, वडगाव ३६, रावणगाव ३९, पिंपोडे-बु ३२, सातारा रोड ३४, मिरज, मालगाव ४२, बेडग ३८, कवठेमहांकाळ ३०, जयसिंगपूर ४३, कुरुंदवाड ५३, दत्तवाड ५२, गगनबावडा ४५, खडकेवाडा ४९, दौंडगे ३२.

मराठवाडा : भवसिंगपूरा ३२, चित्तेपिंपळगाव ९०, चोवका ३०, काचनेर ५६, आडूळ ११२, पिंपळवाडी ७७, बाळानगर ५४, नांदूर ४१, लोहगाव ९१, ढोरकीन ५४, बिडकीन ३७, पैठण ४६, निळजगाव ३५, कन्नड, चापनेर ३१, सुलतानपूर ३०, पोदाद ३२.

- नाशिकमधील इगतपुरी येथील वाडीवऱ्हे येथे ९८ मिलिमीटर पाऊस.
- पैठण तालुक्यातील पाचोड येथील नदीला पूर, गावातील पूल वाहून गेला.
- जालना, बीडमध्ये हलका पाऊस.
- विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, गोंदिया जिल्ह्यांत हलका पाऊस.
- जालन्यातील रोहिलागड येथे १०९ मिलिमीटर पाऊस.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT