Monsoon Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Rain : दिंडोरी, निफाड, मालेगावात पावसाचा जोर

Monsoon Update : काही ठिकाणी पावसाने पाठ फिरवल्याची स्थिती असताना या पावसामुळे मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेरण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.

Team Agrowon

Nashik News : मृग नक्षत्रातील पावसाने सोमवारी (ता. १७) जोरदार हजेरी लावली. ज्यामध्ये मालेगांव, सिन्नर, निफाड व दिंडोरी तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या आनंदात भर टाकली. काही ठिकाणी पावसाने पाठ फिरवल्याची स्थिती असताना या पावसामुळे मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेरण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.

सलग दुसऱ्या दिवशी निफाड तालुक्यातील ओझर, दात्याणे, जिव्हाळेसह इतर गावांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी वाहिले. तर सिन्नर तालुक्यातील वडांगळीसह इतर गावांमध्ये दुपारपासून रिमझिम, तर कुठे मुसळधार पाऊस बरसला. दिंडोरी तालुक्यातील मोहाडी, कसबेवणी, वरखेडा, लखमापूर परिसरात गावांमध्येही हजेरी लावल्यामुळे शेतीकामांना चालना मिळणार आहे.

निफाड तालुक्यातील ओझर, चांदोरी महसूल मंडलांत पावसाचा सलग दुसऱ्या दिवशी जोर दिसून आला. ओढे-नाल्यांमधून पाणी वाहिल्याचे दिसून आले. काही ठिकाणी नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक शिवारांत पाणी साचून वाहू लागले होते.

दिंडोरीतील मोहाडी, कुर्णोली, कोऱ्हाटे, गणेशगाव परिसरात सोमवारी (ता. १७) सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मोहाडी, वरखेडा, लखमापूर या महसूल मंडलांतही पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक भागांत पाणी वाहिले.

मालेगाव तालुक्यातील पूर्व भागात शेतकरी पेरण्याच्या तयारीला लागले आहेत. अनेक ठिकाणी कापूस व मका पेरणी सुरू आहे. अशातच कळवाडी परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. माल्हणगाव, गिगाव, बोधे, दहिवाळ, रोझे, पाडळदे, सांजवहाळ, शेंदुर्णी, नाळे, तर झोडगे भागासह माणके, दहिकुटे, सायने खुर्द, चिखळओहोळ, देवारपाडे येथील शेत शिवारावर कुठे मुसळधार, तर कुठे रिमझिम पाऊस झाला.

नांदगाव तालुक्यातील पूर्व भागात सायंकाळी साकोरा, सारताळे, निमितळे, मूळडोंगरी, जामदरी, जळगाव बुद्रुक, खुर्द, चांदोरा, डॉक्टरवाडीसह परिसरात जोरदार पाऊस होऊन परिसरातील बंधारे, नदी-नाले ओसंडून वाहत होते. तर शेतात पाणीच पाणी झाले होते. पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागात प्रामुख्याने इगतपुरी, त्रंबकेश्वर व पेठ तालुक्यांत काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काहीसा दिलासा या भागातील शेतकऱ्यांना मिळाला आहे.

पावसाची स्थिती :

महसूल मंडल पाऊस (मिमी)

झोडगे २२

कळवाडी ६४

सायने १९

निमगाव २४

किकवारी २३.५

नवी बेज १६.८

दिंडोरी ५४.५

मोहाडी ४०.८

कसबे वणी २२

वरखेडा ५४.४

लखमापूर ४१

धारगाव २०

चांदोरी ३८.५

ओझर ४३.८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार; पुढील ५ दिवसांचा अंदाज काय?

Agri Power Supply : कृषिपंपांना पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा करा

Jalgaon Water Crisis : जळगावात पाणीटंचाईचे सावट

Mango Orchard Management: नवीन लागवडीच्या अतिघन बागेत करावयाची कामे

Buldhana Drought : बुलडाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा

SCROLL FOR NEXT