Kharif Crop Damage : बुलडाणा गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील खरीप पिके पाण्याअभावी करपून गेली आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने संपूर्ण जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके यांनी केली..पक्षाच्या वतीने बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. या वेळी शेळके यांनी शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधले..Drought In Maharashtra: महिनाभर पावसाचा खंड, शेतकरी चिंतेत, कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी.निवेदनात म्हटले आहे, की यंदाच्या खरीप हंगामात पावसाला उशिरा सुरुवात झाली. पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली; मात्र त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पेरलेले बियाणे वाहून गेले किंवा जमिनीत दबले. त्यातच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस कंपनीचे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात आल्याने अनेक ठिकाणी बियाणे उगवले नाही. परिणामी अनेक शेतकऱ्यांना तीन ते चार वेळा पेरणी करावी लागली..जेमतेम पिकांची उगवण होऊन परिस्थिती सुधारत असतानाच गेल्या महिनाभरापासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली. त्यामुळे जिल्ह्यातील खरीप पिके पाण्याअभावी वाळून गेली आहेत. वारंवार पेरणी, खत, बियाणे, औषधे, मजुरी आणि मशागतीचा खर्च केल्याने शेतकरी आधीच कर्जबाजारी झाला आहे. त्यातच हातातोंडाशी आलेले पीक वाळून गेल्याने शेतकऱ्यांवर कर्जाचा मोठा डोंगर उभा राहिला असून तो आर्थिक संकटात सापडला आहे..Ahilyanagar Drought Crisis : अहिल्यानगर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी.या पार्श्वभूमीवर शासनाने बुलडाणा जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी किमान ५० हजार रुपये दुष्काळी मदत द्यावी, रखडलेला पीकविमा तातडीने अदा करावा, कृषिपंपांची वीजबिले माफ करावीत आणि शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण दाबाने वीज उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या..शासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढावे. अन्यथा, बळीराजाच्या प्रश्नांसाठी पक्षाच्या वतीने मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला..या वेळी प्रदेश सरचिटणीस बी. टी. जाधव, प्रदेश सदस्य तात्या कृपाळ, चिखली विधानसभा क्षेत्र प्रमुख डॉ. ज्योतीताई खेडेकर, जिल्हा उपाध्यक्ष पी. एम. जाधव, ह. भ. प. शंकर महाराज, सतीश बाहेकर, सदानंद तेजनकर, महादेवराव शेळके, गजानन वायाळ, रामभाऊ खेडेकर, राष्ट्रीय प्रदेश महिला सदस्य नाझीमाताई खान, महिला जिल्हाध्यक्ष वर्षाताई इंगळे, व्ही.एन.टी. जिल्हाध्यक्ष गणपतराव कुसळकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष गजाननराव भिवसनकर, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष प्रशांत डोंगरदिवे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सईद इकबाल, तालुका अध्यक्ष सुनील सोनवणे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.