Heavy Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain : यवतमाळातील १४ मंडलांत अतिवृष्टी

Rain Update : पुढील पाच दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत १४१.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Team Agrowon

Yavatmal News : जिल्ह्यात पावसाची उघडझाप असली तरी आतापर्यंत १४ महसुली मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पुढील पाच दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत १४१.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी पर्जन्यमान ९२६.८० मिमी आहे. आतापर्यंत प्रत्यक्ष १४१.५ मिमी पाऊस झाला आहे. पावसाचे आगमन झाल्याने गेल्या काही दिवसांपासून पेरणीला वेग आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण क्षेत्राच्या ५२.५१ टक्के पेरणी आटोपली आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या तालुक्यातील १४ महसुली मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

यात यवतमाळ, दारव्हा, बाभूळगाव, पुसद, वणी, राळेगाव, नेर तालुक्यातील गावांचा समावेश आहे. अतिवृष्टीमुळे राळेगाव तालुक्यातील जवळपास तीनशे हेक्टरवरील जमीन खरडून गेली. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करण्याची वेळ आली आहे. जमीन खरडून गेल्याने पुन्हा माती भरावी लागणार आहे. शिवाय, पेरणी केलेले बियाणे गेल्याने दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

या व्यतिरिक्त जिल्ह्यात कुठेही पावसाने फारसे नुकसान झाल्याचे दिसत नाही. अतिवृष्टी झाल्याने या भागातील काही ठिकाणी शेतातील माती रखडून गेली आहे. आगामी पाच दिवस जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह, तर काही भागात विजेच्या कडकडांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शेतकऱ्यांना पिकांसाठी आवश्यक त्या वेळेत पावसाचे पाणी मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे.

चार मंडलांत पुन्हा अतिवृष्टी

जिल्ह्यात काही भागात जोरदार पाऊस होत आहे. आतापर्यंत १४ मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यानंतर शुक्रवारी (ता.२८) चार मंडलांत पुन्हा अतिवृष्टीची नोंद झाली आहे. दारव्हा तालुक्यातील लाडखेड मंडलांत ७५.५० मिमी. पावसाची नोंद झाली असून, दुसऱ्यांदा या मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. महागाव मंडलांत ७५.५०, यवतमाळ तालुक्यातील लोहारा ६५, तर नेर तालुक्यातील मोझर मंडलात ७७ मिमी. पावसाची नोंद झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT