Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain : सिंधुदुर्गात पावसाचा जोर कायम

Maharashtra Rain : वेंगुर्ल्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीकाठची अनेक एकर शेती पाण्याखाली गेली आहे. याशिवाय जिल्ह्याच्या उर्वरित भागात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून पावसाच्या सरीवर सरी सुरू आहेत. वेंगुर्ल्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीकाठची अनेक एकर शेती पाण्याखाली गेली आहे. याशिवाय जिल्ह्याच्या उर्वरित भागात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे.

जोरदार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. रखडलेल्या भातरोप पुनर्लागवडीला पावसामुळे वेग आला आहे. जिल्ह्यात गुरुवारी (ता. २७) दिवसभर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

शुक्रवारी (ता. २८) सकाळपासून देखील जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यात सरीवर सरी कोसळत आहेत. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होताना दिसत आहे. दरम्यान वेंगुर्ले येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे या तालुक्यातील मातोंड आणि तुळस येथील नदीकाठची अनेक एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे.

चार-पाच दिवसांपूर्वीच येथे भातरोप पुनर्लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे या भातशेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे किरकोळ पडझडीचे प्रकार देखील झाले आहेत.

दरम्यान भातरोप पुनर्लागवडीस पूरक पाऊस पडत असल्यामुळे नियमित भातरोप पुनर्लागवडीला गती प्राप्त झाली आहे. शेतमळ्यांमध्ये पुनर्लागवडीची लगबग दिसून येत आहे.

पूरस्थितीची शक्यता

जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस पडत असनू सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे पावसाचा जोर कायम राहिल्यास जिल्ह्याच्या काही भागांत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांत पडलेला तालुकानिहाय पाऊस ः देवगडमध्ये ५५ मि.मी, मालवण ४३, सावंतवाडी ७२, वेंगुर्ला ७९.५, कणकवली ४२, कुडाळ ५८.५, वैभववाडी ४७.३, दोडामार्गमध्ये ६७ मिमी पावसाची नोंद झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT