Heavy Rain : वादळी वाऱ्यामुळे कांदा शेड कोसळले; पोल्ट्री शेड उद्ध्वस्त

Damage Due to Rain : नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह होत असलेला पाऊस अडचणीचा ठरत असून नुकसानीत वाढ होत आहे. गुरुवारी (ता. १६) सटाणा, कळवण, येवला व सुरगाणा तालुक्यांत हे नुकसान अधिक आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon

Nashik News : नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह होत असलेला पाऊस अडचणीचा ठरत असून नुकसानीत वाढ होत आहे. गुरुवारी (ता. १६) सटाणा, कळवण, येवला व सुरगाणा तालुक्यांत हे नुकसान अधिक आहे. वादळामुळे कांदा व्यापाऱ्यांचे कांदा शेड, पोल्ट्रीशेड जमीनदोस्त झाल्याने हा पूर्वमोसमी वादळी वाऱ्यासह पाऊस अडचणी वाढवणारा ठरला आहे.

सटाणा तालुक्यातील पश्‍चिम आदिवासी पट्ट्यात मुल्हेर भागात मध्यम ते हलका पाऊस झाला. तर पूर्व भागात वायगाव येथे विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे पोल्ट्रीशेट उद्ध्वस्त होऊन चारशे कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. अंबासन येथे नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांमध्ये भिंतीचे वातावरण पसरले होते.

Rain Update
Heavy Rain : सोलापुर जिल्ह्यातील तीन महसूल मंडलांत मुसळधार पाऊस

वादळी वाऱ्यांसह विजेचा कडकडाट व पावसाने जोरदार हजेरी लावली. वायगाव, नामपूर रस्त्यावरील पोल्ट्रीधारक शेतकरी मोठाभाऊ रामदास अहिरे यांच्या शेतातील (गट क्रमांक १६१) पोल्ट्री शेडच्या भिंती वादळी वाऱ्यामुळे कोसळल्या, यामुळे चारशे कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. अहिरे यांनी बँकचे कर्ज तसेच हात उसनवार घेऊन मोठ्या हिमतीने पोल्ट्री व्यवसाय उभा केला होता.

मात्र वादळी वाऱ्यामुळे मोठा भाऊ अहिरे यांनी पाहिलेल्या स्वप्नांचा चुराडा झाला. या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सरपंच अशोक अहिरे यांनी भेट दिली असून, महसूल विभागाचे तलाठी व मंडळ अधिकारी यांना भ्रमणध्वनीवर माहिती दिली. तलाठी कल्पेश साळुंखे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पंचनामा केला.

Rain Update
Heavy Rain : खानदेशात पावसाचा धुमाकूळ सुरूच

दिंडोरी तालुक्यातील वणी व परिसरात गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. शंखेश्‍वर नगर परिसरातील नांगी नाल्याजवळील झाडाच्या आडोशाला उभ्या असलेल्या किशोर अंबादास भागवत (वय ५५, मावडी, ता. दिंडोरी) यांच्यावह बाभळीचे झाड कोसळले.

त्यांना जखमी अवस्थेत वणी ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉ. गायधनी यांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वादळी पावसामुळे वणी-पिंपळगाव रस्त्यावरील कांद्याचे ८ शेड कोसळून कांदा भिजला. जवळपास साठ ते सत्तर लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

वाहने दबल्याने नुकसान झाले. अचानक आलेल्या वादळी पावसाने बाजारपेठेतील नागरिकांची धावपळ झाली. बाजारपेठेत भाजीपाला विक्रेत्यांची तारांबळ होऊन दुकानाचे छत उडून गेले. काही ठिकाणी घराचे पत्रेही उडाले. वणी कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com