Heavy Rain Marathwada  Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain Marathwada : मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांतील ७३ मंडलांत धो-धो पाऊस

Monsoon Rain : श्रावणाच्या सुरुवातीपासूनच मराठवाड्यातील बहुतांश भागात पावसाने संततधार बरसने सुरूच ठेवले आहे.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : श्रावणाच्या सुरुवातीपासूनच मराठवाड्यातील बहुतांश भागात पावसाने संततधार बरसने सुरूच ठेवले आहे. रविवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासात मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांतील सुमारे ७३ मंडलांत अतिवृष्टी झाली.

मराठवाड्यात रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी ३९.२ मिलिमीटर, जालन्यामधील ४७.१, बीडमध्ये १९.६, लातूरमध्ये २५.६, धाराशिवमध्ये १६.९, नांदेडमध्ये ३९.८, परभणीमध्ये ५३.४ तर हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक ५२.४ मिलिमीटर सरासरी पाऊस झाला.

संपूर्ण विभागात सरासरी ३५.९ मिलिमीटर पावसाची सरासरी राहीली. रविवारी सकाळपर्यंत झालेला पाऊस सर्व दूर असल्याची स्थिती आहे. रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत अनेक भागांत ढगाळ वातावरण व अधून मधून पावसाची भुरभुर, रिमझिम सुरू होती. काही ठिकाणी अति जास्त प्रमाणात होणारा पाऊस शेती पिकाचा नुकसान करतो आहे. तर काही ठिकाणी मुरवणी होणारा पाऊस पिकांना दिलासा देतो आहे.

छत्रपती संभाजीनगर

लाडसावंगी ७१, चौका ८४.२५, शेकटा ८६, कन्नड ८७.२५, चापानेर ८७.२५, चीकलठाणा ८७.२५, पिशोर ७७.७५, नाचनवेल ६५.२५, चिंचोली ७७.७५, करंजखेड ७७.७५, सुलतानपूर ८२, फुलंब्री ७१.५०, पिरबावडा ६७, वडोद बाजार ८३, बाबरा ९५.२५.

जालना

हसनाबाद ७१, शेवली ६६.२५, अंबड ८८, जामखेड ७९.२५, आष्टी ६६.५०, बदनापूर ७९, शेलगाव ७९, दाभाडी ७१, रोशनगाव ७९,

लातूर

पानगाव ८१.७५

नांदेड

नांदेड शहर ७७.२५, नांदेड ग्रामीण ७९.५०, तुप्पा ८१.२५,वासरणी ८१.२५, विष्णुपुरी ७९.५० , लिंबगाव ८४.२५ , तरोडा ८८, वाजेगावं ८१.२५, नाळेश्वर ८२, कापसी ८१.२५ भोकर ६६.७५, मोघाळी ६६.५०, मुदखेड ८८.२५, मुगट ८८.२५, बारड ८१.५०, दाभड ७९.५०, मालेगाव ७३.२५.

परभणी

परभणी ६७.२५, पेडगाव ७३, जांब ८६, झरी ६६, सिंगणापूर ६७, पिंगळी ७५.२५, परभणी ग्रामीण ७५.२५, टाकळी कुंभ ७०.७५, पाथरी ९३.७५, हदगाव ७८.५०, कासापुरी ८०.७५, जिंतूर ६६.५० , दुधगाव ६७, पूर्णा ८६.२५, कांतेश्वर ७६, ताडकळस ७३.७५, चुडावा ७७.२५, कावलगाव ७२.५०, देऊळगाव ७१, मानवत ७०.२५, कोल्हा ९५.७५, ताड बोरगाव ९५.७५

हिंगोली

वसमत १०५, हयातनगर १०५, गिरगाव ६६.२५, हट्टा ८०.२५, टेंभुर्णी १०५, औंढा ६५.२५, साळणा ६५.२५,जवळा ७३, पानकन्हेरगाव ६५.७५.

जिल्हानुसार अतिवृष्टी झालेली मंडले

हिंगोली जिल्ह्यातील ९, परभणीतील २२, नांदेड जिल्ह्यातील १७, लातूरमधील एक, जालन्यातील ९ तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १५ मंडलांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Subsidy: शेतकरी अनुदानासाठीचे  ४८ लाख अर्ज पडून

Agriculture Department Scam: आवटे समितीच्या अहवालात दोन अधिकाऱ्यांवर ठपका

Jaggery Price: श्रावणामुळे गुजरातमध्ये गुळाच्या मागणीत वाढ

Maharashtra Heavy Rain: घाटमाथ्यावर पावसाचा जोर

Maharashtra Rain: कोकण, घाटमाथा, विदर्भात जोरदार सरी शक्य

SCROLL FOR NEXT