Heavy Rainfall Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rainfall: अतिवृष्टीचा जोरदार तडाखा

Monsoon 2025: गेल्या काही दिवसांपासून गायब झालेला पाऊस सोमवारी (ता. २१) सायंकाळी परतला आणि अकोला, बुलडाणा तसेच वाशीम जिल्ह्यांतील काही महसूल मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली.

Team Agrowon

Akola News: गेल्या काही दिवसांपासून गायब झालेला पाऊस सोमवारी (ता. २१) सायंकाळी परतला आणि अकोला, बुलडाणा तसेच वाशीम जिल्ह्यांतील काही महसूल मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. अचानक झालेल्या या मुसळधार पावसाने शेती व पिकांची धुळधाण झाली. विविध ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मंगळवारी (ता. २२) सकाळपासूनच प्रशासन पाऊस नुकसानीचा अंदाज घेण्यात गुंतली आहे. 

या भागात अनेक ठिकाणी आठवडाभरापासून पाऊस नव्हता. यामुळे पिकांना पावसाची गरज वाढली होती. शेतकऱ्यांनी तुषार सिंचनही सुरू केले होते. अशातच सोमवारी पावसाचे पुनरागमन झाले. या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला तरी अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी मोठे नुकसानही केले आहे. अकोला जिल्ह्यात पातूर, बाळापूर तालुक्यात पावसाने हाहाकार उडवला.

बाळापूर येथे तब्बल १७७.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पारस ८२, पातूर ९४.२, बाभूळगाव ९४.४, आलेगाव १३८.९, चान्नी ७३.४ आणि सस्ती येथेही ७३.४ मिलिमीटर  पाऊस झाला.बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. यात लोणार तालुक्यात सर्वाधिक १७१.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

तसेच मेहकरमध्ये ६५ मिलिमीटर पाऊस झाला. याच तालुक्यातली डोणगाव मंडलात ६१.३, अंजनी बुद्रुक ६५, सुलतानपूर ७४.५, टिटवी १५४.५, हिरडव १८५, अंजनी खुर्द ६९, पळशी बुद्रुक १५१ व जवळा बुद्रुक १७७.३ मिलिमीटर पाऊस पडला.वाशीम जिल्ह्यातही ठिकाणी जोरदार पाऊस  झाला. यात प्रामुख्याने मोप ९०.५, वाकद ८३.३, करंजी ६६.८ व जऊळका येथे ७४.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

लोणारमध्ये तलाव तुडुंब

लोणार तालुक्यातील टिटवी लघुपाटबंधारे तलाव, देऊळगाव कुंडफळ तलाव, बोरखेडी तलाव, गुंधा तलावांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने ते १०० टक्के भरले. त्यात पाण्याचा येवा सुरू आहे, त्यामुळे धरण भरून सांडव्याद्वारे धरणातून विसर्ग सुरू आहे.

पावसाची संततधार चालू असल्यामुळे धरण परिसरातील नद्या व नाले दुथडी भरून वाहत आहे. धरणाच्या खालील नदीवरील नागरिकांनी नदी प्रवाहात जाऊ नये. तसेच नदीकाठ लगतच्या आपली पशू धन, चीजवस्तू, कृषिपंप सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ethanol Policy: धान्यापासून मद्यार्क धोरण जाहीर

Agriculture Department: कृषी विभागाची साहित्य खरेदी नियमानुसारच

India-UK Trade Deal: भारत आणि ब्रिटन यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार करार

Agriculture Department Action: कृषी खात्यातील बेशिस्त ९९ अधिकारी कार्यमुक्त

Maharashtra Monsoon Alert: कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भात ‘रेड अलर्ट’

SCROLL FOR NEXT