
Nashik News : शासनाने ‘मागेल त्याला सौर कृषिपंप योजना’ आणली. मात्र या योजनेत सहभाग नोंदवणाऱ्या शेतकऱ्यांच्या नशिबी निराशा पडली आहे. ‘महावितरण’ने सुचवलेल्या ठेकेदाराची निवड केल्यानंतर शेतकऱ्यांनी संबंधित ठेकेदार कंपनीला दहा टक्के वर्गणी जमा केली. मात्र दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही सौर कृषिपंपांचा लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांची परवड झाली आहे.
मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांना महावितरण कंपनीच्या पोर्टलवर नोंदणी करावी लागते. ही नोंदणी केल्यानंतर कंपनीकडून ठेकेदार कंपन्यांची सूची दाखवण्यात येते. यापैकी एका कंपनीची निवड शेतकऱ्यांना करावी लागते. त्यानंतर योजनेचा निर्धारित दहा टक्के सहभाग हिस्सा ऑनलाइन भरावा लागतो. त्यानंतरच योजनेत लाभार्थी नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महावितरणचे कर्मचारी स्पॉट सर्वे करून त्यांचा अहवाल देतात. तेथून पुढे दोन महिन्यांच्या आत सोलर कृषिपंप कार्यान्वित करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदार अथवा कंपनीला बंधनकारक असते; मात्र, अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी निवडलेल्या कंपन्यांकडून चालढकल केली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांचा फोन कॉल घ्यायलादेखील टाळाटाळ करत आहेत. परिणामी शेतकऱ्यांत संताप व्यक्त होत आहे.
कंपन्यांच्या कार्यपद्धतीमुळे लाभार्थी योजनेपासून वंचित
सुरुवातीच्या काळात सौर कृषिपंपांसाठी ‘मेडा’ या यंत्रणेमार्फत योजना सुरू होती. तेथेदेखील शेतकऱ्यांना सौरपंप मिळण्यासाठी वर्षभर प्रतीक्षा करावी लागली होती. आतादेखील तीन ते चार महिन्यांचा कालावधी उलटला तरी महावितरणच्या मागील त्याला सौरपंप योजनेचा लाभ मिळत नाही.
योजनेसाठी जानेवारीपासून नोंदणी केलेले शेतकरी अद्याप प्रतीक्षेत आहेत. संबंधित ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद देत नाहीत. सदभाव, आयकॉन सोलर इन पॉवर, सनराइज, जीके एनर्जी यांसारख्या अनेक कंपन्यांनी त्यांच्याकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.