Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain : अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत पुन्हा जोरदार पाऊस

Akola Rain News : गेल्या ४८ तासांपासून या भागात विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यात सततच्या पावसाने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे केले आहे.

Team Agrowon

Akola News : गेल्या ४८ तासांपासून या भागात विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यात सततच्या पावसाने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे केले आहे. पळशी बुद्रुक, करंजी, आसेगाव-२ या मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली.

मागील काही तासांपासून सातत्याने ढगाळ वातावरण, कुठे जोरदार पावसाच्या सरी कायम आहेत. तर काही मंडलांमध्ये झडीसारखा पाऊस होत आहे. या पावसाने शेतकऱ्यांची झोप उडवली आहे.

मागील २४ तासांत या जिल्ह्यांमध्ये सार्वत्रिक व जोरदार पाऊस झाला. खामगाव (जि. बुलडाणा) तालुक्यातील पळशी बुद्रुक मंडलात ७५.८ मिलिमीटर, वाशीम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील करंजी मंडलात ७२ मिलिमीटर तर मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव २ मंडलांत ७५.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

बुलडाण्यात १५ हजार हेक्टरचे नुकसान

जिल्ह्यात १८ व १९ ऑक्टोबर या दोन दिवसांतील पावसामुळे सुमारे १५ हजार २३३ हेक्टरवर पिके बाधित झालाचा प्राथमिक अहवाल यंत्रणांनी तयार केला आहे. यात खामगाव तालुक्यात ५५ गावात १८ हजार २३७ शेतकऱ्यांचे सोयाबीन, कपाशी, मका, भाजीपाल्याचे १४ हजार ३९६ हेक्टरवर नुकसान झाले.

मेहकर तालुक्यात ६ गावातील ४४५ शेतकऱ्यांचे २५८ हेक्टर तर चिखली तालुक्यात ११ गावांतील २४२ शेतकऱ्यांचे ६९ हेक्टरचे नुकसान दर्शविण्यात आले आहे. या महिन्यात बुलडाण्यात दसऱ्याच्या काळात झालेल्या पावसाने दीड लाख हेक्टरपर्यंत नुकसान झाले होते.

जिल्हानिहाय सरासरी पाऊस

बुलडाणा १८.५ मिलिमीटर

अकोला १८ मिलिमीटर

वाशीम २६.८ मिलिमीटर

पावसामुळे होत असलेले नुकसान

सोयाबीन सोंगणी व मळणीत अडथळे

पीक सतत भिजत असल्याने कोंब निघू लागले

वेचणीला आलेला कापूस भिजतो आहे

सततचा पाऊस तुरीच्या पिकाला बाधक

फळबागा, भाजीपाल्याचेही नुकसान

रब्बीची तयारी लांबत चालली

मागील काही तासांत मालेगाव (जि. वाशीम) तालुक्यातील सुदी येथे मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे माझ्या शेतात सोयाबीनच्या सुडीखाली पावसाचे पाणी गेले. जोरदार वाऱ्यामुळे सुडीवरील ताडपत्र्यासुद्धा उडाल्या आहेत. अजानक आलेल्या पावसामुळे माझ्या शेतात सोयाबीन काढणी चालू असताना थोडे सोयाबीन भिजले. पावसाने सोयाबीनचे व कपाशीचेही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्यामुळे काम लांबणीवर पडत आहे. त्यातच पावसात कापूस भिजतो आहे. हातात आलेले पीक निघून गेल्याचे दुःख आहे. असे होत असल्यामुळे शेती करायची इच्छा आता कमी होत आहे.
- विनोद पाटील, शेतकरी, सुदी, ता. मालेगाव, जि. वाशीम
तेल्हारा तालुक्यात सातत्याने पाऊस होत आहे. मी मागील अनेक दिवसांपासून सोयाबीन तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु पावसामुळे शेतात हार्वेस्टर जाऊ शकत नाही. रस्ता सुकला की नेण्याचे नियोजन करतो तर दुसऱ्या दिवशी रस्ता पुन्हा पाऊस झाला की ओला होतो. पीक चांगले असूनसुद्धा मातीमोल होत चालले आहे.
- प्रमोद गावंडे, शेतकरी, तेल्हारा, जि. अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Seed : कांदा बियाण्यांसाठी पुन्हा शोधाशोध सुरू

Rain Update : सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले

Cotton Crop Damage : कापसाच्या नुकसानीकडे विमा कंपनीची डोळेझाक

Crop Damage : मॉन्सूनोत्तर पावसाचा ३८ हजार हेक्टरला फटका

Crop Damage : आभाळच फाटलंय, सांगा कसं जगायचं?

SCROLL FOR NEXT