Heat Wave Agrowon
ॲग्रो विशेष

Heat Wave : अहिल्यानगर जिल्ह्यात तीन दिवस उष्णतेची लाट

High Temprature : जिल्ह्यात आगामी तीन दिवस उष्णतेची लाट राहणार आहे. हवामान खात्याने जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’चा इशारा दिला आहे. नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाव होण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Team Agrowon

Aahilyanagar : अहिल्यानगर ः जिल्ह्यात आगामी तीन दिवस उष्णतेची लाट राहणार आहे. हवामान खात्याने जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’चा इशारा दिला आहे. नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाव होण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हवामान खात्याने राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार तीन दिवस उष्ण व दमट हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात १७ ते २० एप्रिल दरम्यान उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. जिल्ह्यासाठी येलो अलर्ट दिला आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना उष्मा लाटेमुळे उद्भवणाऱ्या उष्माघातांनी मानव, पशू-प्राणी यांचेवर होणारे दुष्परिणाम टाळण्याच्या दृष्टीने दक्षता घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाव होण्यासाठी पुरेसे पाणी प्यावे, घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा, सूर्य प्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा, हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत, प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे, काम करीत असताना टोपी किंवा रुमाल बांधावा, गुरांना, पाळीव प्राण्यांना सावलीत ठेवण्यात यावे, रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात मार्च महिन्यापासूनच उष्णतेची तीव्रता वाढली आहे. अवकाळी पावसामुळे एक आठवडा हवेत गारवा निर्माण झाला होता. अवकाळी पावसाचे ढग विरल्यानंतर उष्णता वाढत होती. गेल्या आठवड्यापासून सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास होते. उष्णतेमुळे रस्ते दुपारी ओस पडत होते. सामाजिक संस्थांनीही पिण्याच्या पाणपोई रस्ते आणि प्रमुख चौकात सुरू केल्या होत्या.

नागरिकांनी शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी पुरेसा प्रमाणात पाणी प्यावे. दुपारीच्या वेळेस उष्णतेची तीव्रता जास्त असल्याने अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडावे. शक्यतो दुपारी घराबाहेर पडू नये. शेतीची मशागत किंवा कष्टाची कामे दुपारी करू नयेत.
- डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT