Heat Wave : नांदेडला उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण

Summer Season : नांदेडला तापमानात वाढ झाल्याने नागरिकांच्या अंगाची लाही-लाही होत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे देनदिन व्यवहारावरही परिणाम दिसून येत आहे.
Heat Wave
Heat WaveAgrowon

Nanded News : नांदेडला तापमानात वाढ झाल्याने नागरिकांच्या अंगाची लाही-लाही होत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे देनदिन व्यवहारावरही परिणाम दिसून येत आहे. रविवारी नांदेडला कमाल तापमान ४२.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. ही उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज असल्याने नागरिक हेराण झाले आहेत.

नांदेड जिल्ह्यात रविवारी (ता. २८) हा दिवस सर्वाधिक तापमानाचा दिवस ठरला आहे. रविवारी कमाल ४२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हा या उन्हाळ्यातील सर्वाधिक उष्ण दिवस होता. येत्या काळात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वाढत्या उष्णतेमुळे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील प्रमुख रस्ते दुपारच्या वेळी निर्मनुष्य होत आहेत.

Heat Wave
Summer Heat : लाखणगावात पाण्याअभावी पिके करपली

जिल्ह्यात वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, अशी सूचना जिल्हा प्रशासन तसेच आरोग्य विभागाने केली आहे. या आठवड्यात नांदेडमध्ये २२ एप्रिल रोजी कमाल तापमान ३९.२ अंश सेल्सिअस नोंदले होते.

त्यानंतर २३ एप्रिल रोजी ४०.२ अंश सेल्सिअस, २४ एप्रिल रोजी ३९.२ अंश सेल्सिअस, २५ एप्रिल रोजी ३९.६ अंश सेल्सिअस, २६ एप्रिल रोजी ४०.२ अंश सेल्सिअस आणि २७ एप्रिल रोजी ४१.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

Heat Wave
Summer Heat : वाढत्या तापमानामुळे पिकांना फटका सुरूच

नांदेड लोकसभा मतदार संघासाठी २६ एप्रिल रोजी मतदान झाले. यादिवशी कमाल तापमान ४०.२ अंश सेल्सिअस इतके होते. या वाढत्या तापमानाचाही काही अंशी मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम झाल्याचे आढळून आले.

२८ एप्रिल रोजी जिल्ह्यात या उन्हाळ्यातील सर्वांत उष्ण दिवसाची नोंद झाली आहे. रविवारी कमाल तापमान ४२.४ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. आगामी काळात या तापमानात काही अंशाने आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.

काळजी घेण्याचे आवाहन

नागरिकांनी तीव्र उन्हापासून बचाव होण्यासाठी वाढत्या तापमानात कष्टाची कामे करणे टाळावे, ही कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी करावेत. सैल पांढर्‍या रंगाचे कपडे वापरावेत. भरपूर पाणी प्यावे. सावलीत विश्रांती घ्यावी. अस्वस्थ वाटल्यास ताबडतोब उपचार सुरु करावा. उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपरणे यांचा वापर करावा, असे आरोग्य विभागाने कळविले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com