Mango Production Agrowon
ॲग्रो विशेष

Heat Stress Crop Damage : स्ट्रॅाबेरी, आंब्याला तापमानवाढीचा फटाका

Strawberry Crop Damage : जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढला असून सर्वच दैनंदिन व्यवहारावर परिणाम झाला आहे. सकाळी दहापासून उन्हाच्या झळा बसत असल्याने अंतिम टप्प्यात असलेल्या उसाला काहीसा ब्रेक लागला आहे.

Team Agrowon

Satara News : जिल्ह्यात ऐन फेब्रुवारी महिन्यात तापमानाचा पारा ३५ ते ३६ अंश सेल्सिअस गेल्याने शेतीसह सर्वच दैनंदिन व्यवहार परिणाम झाला आहे. स्ट्रॅाबेरीचा आकार, लवकर परिपक्वता तर आंब्याची फळगळती होऊ लागली आहे. तसेच गहू, हरभरा पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे.

जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढला असून सर्वच दैनंदिन व्यवहारावर परिणाम झाला आहे. सकाळी दहापासून उन्हाच्या झळा बसत असल्याने अंतिम टप्प्यात असलेल्या उसाला काहीसा ब्रेक लागला आहे. महाबळेश्वर, जावळी, वाई तालुक्यातील स्ट्रॅाबेरी हंगामाला फटका बसत आहे.

सध्या दुसऱ्या, तिसऱ्या टप्यातील हंगाम सुरू असून उन्हाच्या तीव्रतेमुळे स्ट्रॅाबेरी लवकर पक्व होऊ लागली आहे. फळाना चटके पडणे, कमी आकारमानात ही पक्व होत असल्याने वजन कमी होणार असून चवीवरही परिणाम होणार आहे.

यामुळे अंतिम टप्प्यात होणाऱ्या फायदा शेतकऱ्यांचा मिळणार नाही. आंबा मोहरातून फळधारणेच्या सुरू झाली आहे. तापमानवाढी फळगळ असून मोठ्या फळांना चट्टे पडत आहेत

रात्रीची गर्दी...

सकाळपासून तापमानात वाढ होत असल्याने दैनंदिन व्यवहार परिणाम दिसू लागला आहे. सध्या जिल्ह्यात यात्रा-जत्रा सुरू असून यावर तापमानवाढीचा परिणाम झाला आहे. पै-पाहुणे, मित्र परिवार दिवसा न येता रात्रीच्या वेळी येत असल्याने गर्दी होत आहे.

दुपारवेळच्या लग्न समारंभात गर्दी कमी दिसत आहेत. ऊन वाढल्याने थंड पाणी पिले जात असल्याने ताप, सर्दी, खोकला यासारखे आजार मोठ्या प्रमाणात होत आहे. ज्येष्ठानी ही तापमान जुने आजार त्रास देत आहेत. शाळा, महाविद्यालयाचा परिक्षा काळ असल्याने या उन्हात जावे लागत आहे.

तापमान वाढीमुळे सर्वच पिकांवर कमी अधिक प्रमाणात परिणाम होत आहे. शेतकऱ्यांनी फळबागासाठी बागेत पालापाचोळ्याचे आच्छादन करावे. यामुळे पाण्याची बचत होऊन कुजलेल्या पालापाचोळ्यामुळे अन्नद्रव्ये पिकांना मिळते. तणाचा प्रादुर्भाव कमी होऊन फळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत होते.
- भूषण यादगीरवार, विषय विशेषज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department LOGO : कृषी विभागाचं नवीन 'बोधचिन्ह' आणि 'घोषवाक्य' ठरलं; राज्य सरकारचा निर्णय

Hawaman Andaj: राज्यात थंडी वाढायला सुरुवात; उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात लक्षणीय घट

Post Harvest Tips: काढणीपश्‍चात साठवणीतील नुकसानीची कारणे

PDKV Akola: आत्मनिर्भरतेसाठी राष्ट्र हाच धर्म मानून प्रयत्न हवे; डॉ. गडाख

Rabi Season: रब्बी लागवड अवघी ८.१८ टक्के

SCROLL FOR NEXT