Onion Crop Damage Compensation : नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचे धनादेश

Onion Crop : आमदार डॉ.आहेर व कृषीमंत्री कोकाटे यांच्या प्रयत्नातून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति एकरी ४० हजार रुपये प्रमाणे महालपाटणे, मेशी व खामखेडा येथील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली.
Manikrao Kokate
Manikrao Kokate Agrowon
Published on
Updated on

Nashik News : तालुक्यातील मेशीसह महालपाटणे, खामखेडा आदी परिसरात उन्हाळी कांद्यावर तणनाशकाची फवारणीमुळे नुकसान झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बुधवार (ता. १९) देवळा येथे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले.

अॅड. कोकाटे यांनी नुकसानीची २६ जानेवारी रोजी रात्रीच्या वेळी नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली होती. यासंबंधी आमदार डॉ. राहुल आहेर यांनीही याबाबत पाठपुरावा कायम ठेवल्याने संबंधित शेतकऱ्यांना नुकसानीची मदत मिळाल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

Manikrao Kokate
Onion Crop Damage : तणनाशक फवारणीमुळे कांदा पीक जळाले

मेशी येथे शेतकऱ्यांनी इंडियन पेस्टीसाईड लिमिटेड कंपनीचे तणनाशक कांदा पिकावर फवारल्याने जवळपास शंभर एकरपेक्षा जास्त क्षेत्रावरील कांदा पीक नष्ट झाल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आमदार डॉ.आहेर व कृषीमंत्री कोकाटे यांच्या प्रयत्नातून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति एकरी ४० हजार रुपये प्रमाणे महालपाटणे, मेशी व खामखेडा येथील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली.

Manikrao Kokate
Onion Crop Damage : येवल्यातही कांदा लागवडीचे तणनाशक फवारणीमुळे नुकसान

शिवजयंतीच्या दिवशी प्रातिनिधिक स्वरूपात पाच शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा धनादेश कोकाटे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. आमदार डॉ. राहुल आहेर, सुनील आहेर, उपविभागीय कृषी अधिकारी अशोक डमाळे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, गटविकास अधिकारी राजेश कदम, प्रभारी तालुका कृषी अधिकारी संजय वाघ, कृषी अधिकारी नलिनी खैरनार, कृषी सहायक व्ही. आर. व्हलगडे, एम. ए. जाधव, डी. वाय. भदाणे आदी उपस्थित होते.

यावेळी देवळा तालुक्यातील मेशी या गावातील कांदा पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात नुकसान भरपाईचे धनादेश देण्यात आले. यामध्ये प्रवीण भाऊसिंग शिरसाट (र१ लाख), रघुनाथ केदा शिरसाट (१ लाख २० हजार), अलकाबाई बापू चव्हाण (४९,२००),सतीश अंबादास बोरसे (३२०००),शरद मधुकर चव्हाण (५१,२००) यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशाचे वाटप करण्यात आले.

तालुका शेतकरी मदत

देवळा ५२ ४० लाख

कळवण २० १४ लाख

सटाणा १२ ८ लाख

एकूण ८४ ६२ लाख

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com