Jammu Kashmir Legislative Assembly Session  Agrowon
ॲग्रो विशेष

Article 370 Argument : जम्मू-काश्मीर विधानसभेत ‘कलम ३७०’वरून बाचाबाची

Jammu Kashmir Legislative Assembly Session : जम्मू-काश्मीर विधानसभेच्या अधिवेशनात आज दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आमदार आणि विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये कलम ३७० बाबतच्या ठरावावरून बाचाबाची झाली.

Team Agrowon

Shrinagar News : जम्मू-काश्मीर विधानसभेच्या अधिवेशनात आज दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आमदार आणि विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये कलम ३७० बाबतच्या ठरावावरून बाचाबाची झाली. अखेर विधानसभा अध्यक्षांनी मार्शलना बोलावून गोंधळ घालणाऱ्या आमदारांना सभागृहाबाहेर काढण्यात आले.

सभागृहाचे कामकाज गुरुवारी (ता. ७) सुरू झाल्यानंतर लेंगेट येथील आमदार खुर्शिद अहमद शेख यांनी अध्यक्षांसमोरील हौद्यामध्ये उतरून कलम ३७० आणि ३५अ पुन्हा लागू करू आणि राजकीय कैद्यांची सुटका करू, अशा आशयाचा फलक झळकावला. त्यावरून भाजपचे विरोधी पक्षनेते सुनील शर्मा यांच्यासह भाजपच्या आमदारांनी आक्षेप नोंदविला.

तसेच काही आमदारांनी हौद्यात उतरून शेख यांच्या हातातील फलक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी शेख यांच्या मदतीला नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार आणि सज्जाद लोन आणि वहीद पारा हे आले.

या आमदारांमध्ये बाचाबाची झाल्याने अखेर मार्शलना पाचारण करण्यात आले आणि भाजपच्या आर. एस. पठानिया यांच्यासह काही आमदारांना सभागृहाबाहेर नेले. यावेळी बाचाबाचीत तीन आमदार किरकोळ जखमी झाले. यानंतरही भाजपच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी सुरूच ठेवली.

३७० कलम लागू करण्याबाबत फलक झळकावणारे आमदार खुर्शिद अहमद शेख हे रशीद इंजिनीअर यांचे भाऊ आहेत. रशीद यांना टेरर फंडिग प्रकरणी अटक करण्यात आली असून सध्या त्यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT