Hariyana Jammu Kashmir Election Result : हरिणायात तिसऱ्यांदा भाजप, जम्मू काश्मीरच्या जनतेची काँग्रेस आघाडीला साथ

Hariyana Election Result : हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी अंतिम टप्प्यात आली असून दोन्ही राज्यांचा जनतेचा कौल जवळपास स्पष्ट झाला आहे.
Hariyana Jammu Kashmir Election Result
Hariyana Jammu Kashmir Election Resultagrowon
Published on
Updated on

Jammu Kashmir Election Result : हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी अंतिम टप्प्यात आली असून दोन्ही राज्यांचा जनतेचा कौल जवळपास स्पष्ट झाला आहे. हरियाणामध्ये तिसऱ्यांदा भाजपने सत्ता स्थापनेसाठीचा बहुमताचा आकडा गाठला आहे तर जम्मु काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्ला आणि काँग्रेस पक्षाने मिळून बहुमताचा आकडा गाठला आहे.

हरियाणामध्ये भाजप ४९ तर काँग्रेस ३६ जागांवर आघाडीवर आहे. हरियाणाच्या ग्रामीण भागात काँग्रेसचे आमदारांना चांगली साथ मिळाली आहेत तर शहरी मतदारांनी भाजपला साथ दिल्याने त्यांनी बहुमताचा आकडा पार केला. शहरी हरियाणात भाजपला ३० पैकी २१ जागा मिळताना दिसत आहेत तर काँग्रेसला फक्त ५ जागा मिळताना दिसत आहेत.

हरियाणातही जाट समाजाकडून भाजपला साथ मिळणार नाही असे निवडणुकीपूर्वी बोलले जात होते परंतु भाजपला जाट समाजाने चांगलीच साथ दिल्याचे दिसून येत आहे. २०१९ मध्ये भाजपला ३० टक्के जागांवर जाट समाजाला समाधान मानावे लागलं होते परंतु २०२४ साली भाजपला ५१ टक्के जाट समाजाच्या जागा निवडूण आणण्यात यश आले आहे.

जम्मू आणि काश्मीरमध्ये, एनसी आणि काँग्रेस आघाडीने ५२ जागांवर आघाडी घेत बहुमताचा आकडा ओलांडला आहे, तर सत्तेत असलेल्या भाजपला काश्मीर जनतेने नाकारल्याने २९ जागा मिळाल्या आहेत. मेहबुबा मुफ्ती यांचा पक्ष पीडीपीला अवघ्या ४ जागांवर समाधान मानावे लागलं आहे.

Hariyana Jammu Kashmir Election Result
दिल्ली, हरियाना, पंजाबमध्ये माॅन्सूनची प्रगती

नायब सैनी हरियाणाचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता

निवडणुकीदरम्यानच भाजप नेतृत्वाने नायब सैनीच मुख्यमंत्री होतील, असे सांगितले होते. निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप त्याची औपचारिक घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. संध्याकाळी ७ वाजता पंतप्रधान मोदी भाजपच्या मुख्यालयात पोहोचणार आहेत. यानंतर हरियाणाच्या विजयासाठी कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत तर जम्मू-काश्मीरमधील निकालाबाबत ते भाष्य करण्याची शक्यता आहे.

जम्मू-काश्मीरच्या निकालाबाबत ओमर अब्दुल्ला म्हणतात

जम्मू-काश्मीरच्या निकालाबाबत ओमर अब्दुल्ला म्हणाले की, मी संपूर्ण जम्मू-काश्मीरबद्दल बोलणार नाही कारण अनेक जागांचे निकाल येणे बाकी आहे. मी बडगाममध्ये उभा असताना मला सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी येथील मतदारांचे आभार मानतो. मागील ५ वर्षात आमचा पक्ष नष्ट करण्याचा प्रयत्न झाला, परंतु आम्हाला जे नष्ट करण्यासाठी आले होते त्यांचा पत्ता कुठे आहे हे जनतेने ठरवले आहे. आम्ही काश्मीरी जनतेसाठी काम करत राहणार असल्याचे मत अब्दुल्ला यांनी मांडले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com