Labor Shortage : शेती कामासाठी मजुरांची कमतरता

Agricultural Work : परतीचा पाऊस लांबल्याने कर्जतमध्ये भातकापणीला दिवाळीनंतर वेग आला आहे. शेतकरीवर्ग भातकापणी करण्यात गुंतलेला दिसून येत आहे.
Labor
LaborAgrowon
Published on
Updated on

Karjat News : परतीचा पाऊस लांबल्याने कर्जतमध्ये भातकापणीला दिवाळीनंतर वेग आला आहे. शेतकरीवर्ग भातकापणी करण्यात गुंतलेला दिसून येत आहे. तर अनेक भागात मजूरांची कमतरता दिसून येत आहे. त्‍यामुळे शेतकरी चिंताग्रस्‍त झाला आहे.

कोकणातील रायगड जिल्ह्यात भातशेती ही एक मुख्य शेत आहे. परंतु शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे विशेषतः कर्जत, पनवेल, उरण आणि पेण भागात शेतीला मोठा धोका निर्माण झाला आहे. हे भाग मुंबईच्या जवळ असल्याने, या ठिकाणी उद्योग आणि वाहतुकीचे मोठे प्रकल्प उभारण्यात आले आहेत.

Labor
NREGA Labor : राज्यात नरेगाच्या कामावर दोन लाख चौतीस हजार मजूर

ज्यामुळे शेतीला जागा कमी होत आहे. तथापि, अनेक शेतकरी आपले पिढीजात व्यवसाय टिकवण्यासाठी शेती करण्याचा प्रयत्न करत आहेत. परतीच्या पावसाच्या विलंबामुळे भातकापणी उशिरा सुरू झाली असून, दिवाळीनंतर त्याला वेग आला आहे. यामुळे शेतकरीवर्ग सध्या भातकापणीच्या कामात व्यग्र आहेत.

Labor
Labor Shortage : खानदेशात मजूरटंचाई वाढली

सध्याची भातकापणी अंतिम टप्प्यात असून या काळात शेतकरी मालाची मळणी आणि साठवणूक करतात. कापणीच्या या प्रक्रियेत खूप मेहनत आणि कष्ट लागतात, पण त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदही असतो. भातकापणीसाठी ‘विल्या’ म्हणजेच पारंपरिक हत्यार वापरले जाते, विशेषतः जिथे आधुनिक यंत्रे पोहोचणे कठीण असते, तिथे शेतकरी आजही पारंपरिक पद्धतीला प्राधान्य देत आहे.

सध्या मात्र कापणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तालुक्‍यात प्रत्‍येकी किमान हजार रुपये मजुरी देण्यात येत असूनदेखील कर्मचारी मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. दिवाळीनिमित्त अनेकजण आपल्या मूळगावी गेल्याने मजुरांची चंटाई निर्माण झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com