Anganwadi Agrowon
ॲग्रो विशेष

Anganwadi : बालकांच्या आरोग्यासाठी ‘एचबीएनसी’ किट

जिल्ह्यात ग्रामीण व नागरी भागांमध्ये आशा स्वयंसेविका योजनेची अंमलबजावणी केली जात आहे.

Team Agrowon

Wardha Anganwadi News : बालकांची घरच्या घरी काळजी कशी घ्यावी, याबाबत उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आशा स्वयंसेविकांना विशिष्ट वस्तूंचे किट उपलब्ध करून देणे आवश्यक असते.

ग्रामपंचायत (Grampanchyat) स्तरावर हे किट उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केली होती. त्याला प्रतिसाद देत ११८ ग्रामपंचायतींनी २४५ आशांना ही किट उपलब्ध करून दिली आहे. लवकरच आशा स्वयंसेविकांना किट उपलब्ध होणार आहे.

जिल्ह्यात ग्रामीण व नागरी भागांमध्ये आशा स्वयंसेविका योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. ग्रामीण भागामध्ये १ हजार ३३ आशा स्वयंसेविका ही योजना प्रभावीपणे राबवीत आहे.

या योजनेंतर्गत आशा स्वयंसेविकांना विविध स्वरूपाच्या आरोग्यविषयक कामाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.

त्यात एचबीएनसी अर्थात घरच्या घरी बालकांची कशी काळजी घ्यावी, या कार्यक्रमाचा समावेश आहे.

आशा स्वयंसेविकांना एचबीएनसी कार्यक्रमांतर्गत नवजात बालकांच्या घरी जाऊन गृहभेट देणे व भेटीच्या दरम्यान बालकाला पकडण्यापूर्वी हात धुण्याचे प्रात्यक्षिक, बाळाचे वजन, तापमान घेणे, बाळाला उबदार ठेवण्याच्या पद्धती मातेला समजावून सांगणे, श्वासाची गती मोजणे इत्यादी कृती आशा स्वयंसेविकांना कार्यक्रम दरम्यान करावयाच्या असतात.

त्यादृष्टीने आशा स्वयंसेविकेकडे एचबीएनसी किट व त्यामध्ये डिजिटल घड्याळ, डिजिटल थर्मामीटर, वजन काटा, नवजात बाळा करिता छोटे ब्लॅंकेट, फिडिंग चमचा, साबण, साबणाचा डबा हे साहित्य आवश्यक आहे.

‘मार्गदर्शन सूचनेनुसार व्यवस्थापन करावे’

किट उपलब्धतेमुळे गावपातळीवर आशा स्वयंसेविकांना आपल्या कार्यक्षेत्रातील नवजात बालकांना आरोग्य विषयक सेवा देण्यास सोईचे होणार आहे. बालमृत्यूदर, अर्भक मृत्यू दर कमी होण्यास देखील मोठी मदत होणार आहे.

आशा स्वयंसेविकांनी गाव पातळीवर बालकांच्या घरोघरी जाऊन बाळांचे व्यवस्थापन मार्गदर्शक सूचनेनुसार करावे, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabbi Anudan GR: विदर्भासाठी २२६४ कोटींचे रब्बी अनुदान मंजूर; यवतमाळ जिल्ह्याला सर्वाधिक ६३८ कोटी मिळणार

Anjani Project : अंजनी प्रकल्पासह वसंत कारखाना पुन्हा चर्चेत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसीठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचा १,५०० रुपयांचा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात

Farmer Relief: अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांना वाढीव मदतीसाठी ५ कोटी मंजूर

Maize Crop Damage: बुलडाण्यात पावसाचा मका पिकाला तडाखा

SCROLL FOR NEXT