Paddy Harvesting  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Harvesting : सिंधुदुर्गात १० हजार हेक्टरवरील भातपिकाची कापणी पूर्ण

Paddy Crop : हळवी भातपिके सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात परिपक्व झाली होती. परंतु सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना या पिकांची कापणी करता येत नव्हती.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यातील १० हजार हेक्टरवरील भातपीक कापणी पूर्ण झाली असून पावसाने उघडीप दिल्यामुळे गतीने कापणी सुरू आहे. पुढील आठ ते दहा दिवसांत ५० टक्क्यांपेक्षा अधिक कापणी पूर्ण होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात हळवी भातपिके सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात परिपक्व झाली होती. परंतु सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना या पिकांची कापणी करता येत नव्हती. ११ हजारहून अधिक हेक्टरवर या पिकांची लागवड होती. काही भागांत झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे पिकांचे नुकसान झाले.

परंतु सतत पडणाऱ्या पावसामुळे परिपक्व झालेल्या १५ हजार हेक्टरवरील भातपिके संकटात सापडली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र गेले पाच-सहा दिवस पावसाने पूर्णतः उघडीप दिली आहे.

त्यामुळे भातपीक कापणीला गती आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १० हजार हेक्टरवरील कापणी पूर्ण झाली आहे. पावसाने आणखी काही दिवस उघडीप दिली तर आठ ते दहा दिवसांत ५० टक्के क्षेत्रावरील कापणी पूर्ण होईल, असा अंदाज आहे.

जिल्ह्यात ६२ हजार हेक्टरवर भातपीक लागवड आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात केलेली लागवड कापणीयोग्य झाली आहे. याशिवाय तिसऱ्या टप्प्यातील लागवडीपैकी ५० टक्के पिके कापणीला आली आहेत. साधारणपणे वीस टक्के पिके वगळता इतर पिकांची कापणी येत्या दहा ते पंधरा दिवसांत होणे आवश्यक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT