Paddy Harvesting : हळव्या भात पिकाच्या कापणीला जोर

Paddy Crop : दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने नवरात्रीच्या आधीपासून तालुक्यातील शेतकऱ्यांनी हळव्या भातपिकाच्या कापणीला जोमाने सुरुवात केली आहे.
Paddy Harvesting
Paddy Harvesting Agrowon
Published on
Updated on

Latest Agriculture News : तालुक्यात यंदा जुलैच्या सुरुवातीपासूनच पावसाचे दमदार आगमन झाले होते, मात्र सततच्या पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडणीत सापडला होता.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने नवरात्रीच्या आधीपासून तालुक्यातील शेतकऱ्यांनी हळव्या भातपिकाच्या कापणीला जोमाने सुरुवात केली आहे.

यंदा तालुक्यात ७,५५८ एकर क्षेत्रावर हळवे, निमगरवे, गरवार भातपिकाची लागवड करण्यात आली आहे. हळवे भातपीक ९०-११० दिवसांत तयार झाले असल्याने विक्रमगड व परिसरातील आंबेघर, बालापूर, दादडे, शेलपाडा, खडकी, सारशी, अंधेरी, ओंदे, विक्रमगड आदी भागातील शेतकऱ्यांनी भातकापणीला सुरुवात केली आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Paddy Harvesting
Paddy Harvesting : रत्नागिरीत उशिराने भात कापणीचा रब्बीवर परिणाम

यंदाच्या लागवड क्षेत्रात हळवा भाताची रोपणी आणि लागवड वेळेवर झाल्यामुळे भातपीक जोमाने आले होते; परंतु यंदा पाऊस अनियमित झाल्याने काही शेतकऱ्यांच्या भातावर रोगांचा प्रादुर्भाव दिसला होता.

Paddy Harvesting
Paddy Harvesting : रत्नागिरी जिल्ह्यात ४ हजार हेक्टरवरील भात कापणी पूर्ण

गेल्या काही वर्षांत विक्रमगड परिसरात २५०० ते २६०० मि.मी. पावसाची सरासरी गाठली जाते, यंदा मात्र कमी पर्जन्यमान झाले. मात्र परतीच्या पावसाचा काही भरवसा देता येत नसल्याने तयार भातपीक कापून घ्यावे, असे शेतकऱ्यांनी ठरवले आहे. दिवाळीच्या अगोदर भातकापणीला जोमाने सुरुवात केली आहे.

परतीच्या पावसाची भीती

आता परतीचा पाऊस पुन्हा कोसळला, तर तयार झालेले भातपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. कारण शेतकरी कापणीच्या कामांना लागलेले आहेत. कापलेले भात वाळवण्याकरिता ठेवत असल्याने ते पुन्हा पावसाने भिजल्यास तयार भाताला पुन्हा कोंब फुटून त्याचे मोठे नुकसान होईल, अशी तालुक्यातील शेतकऱ्यांना भीती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com