Soybean Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Crop Damage : काढणीला आलेल्या सोयाबीनला पावसाचा फटका

Heavy Rain Crop Loss : गेल्या आठ दिवसांपासून राज्यातील विविध भागांत सुरू असलेल्या जोरदार पावसाचा काढणीला आलेल्या सोयाबीनला फटका बसत आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : गेल्या आठ दिवसांपासून राज्यातील विविध भागांत सुरू असलेल्या जोरदार पावसाचा काढणीला आलेल्या सोयाबीनला फटका बसत आहे. बहुतांश ठिकाणी शेतात पाणी साचल्याने काढणी करता येत नाही. काही ठिकाणी काढणी करून टाकलेले सोयाबीन पाण्यात भिजत आहे. त्यामुळे दाण्याला कोंब फुटल्यास त्याचा दरावर परिणाम होण्याची शेतकऱ्यांना भीती आहे.

राज्यात सोयाबीनचे ४१ लाख ४९ हजार ९९२ हेक्टर क्षेत्र आहे. यंदा ५१ लाख ५९ हजार २६७ हेक्टरवर म्हणजे १२४ टक्के पेरणी झालेली आहे. यंदा सरासरीपेक्षा दहा लाख हेक्टर क्षेत्र अधिक आहे. नगरसह बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर, सातारा, सांगली भागांत सोयाबीनचे क्षेत्र बऱ्यापैकी आहे.

यंदा पावसाची स्थिती चांगली असल्याने गेल्यावर्षीपेक्षा एक लाख दहा हजार हेक्टरवर अधिक पेरणी झाली आहे. एखाद्या भागातील अपवाद वगळला सोयाबीनसह यंदा खरिपातील पिकांची स्थिती चांगली आहे. राज्यातील बहुतांश भागात आता सोयाबीनची काढणी सुरू झालेली आहे. मात्र गेल्या आठ दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसाचा सोयाबीन काढणीवर परिणाम होत आहे.

सततच्या पावसाने सोयाबीन काढणी करता येत नाही. काही भागात काढणी करून टाकलेले सोयाबीनची पावसामुळे सोंगणी करता येत नसून जागेवरच पावसात भिजत आहे. पावसात सतत भिजत असल्याने दाण्याला डाग पडणे, कोंब फुटणे यांसारखे प्रकार झाले तर बाजारात दराला फटका बसण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

आधीच बाजारात सोयाबीनला दर नाही. त्यात पावसामुळे नुकसान झाल्यास अधिक उत्पादन होऊनही आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. खास करून बियाणांसाठी वापर होणाऱ्या सोयाबीनला भिजून कोंब फुटला तर अधिक नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

मी एक एकर सोयाबीन पेरणी केलेली आहे. सोयाबीन काढणीला आलेले असताना सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचलेले असून हार्वेस्टिंग करणे अवघड झाले आहे. मशिन शेतात न्यायला सध्या तरी वाव नाही. अधिक काळ भिजत राहिले तर पुढील वर्षासाठी सोयाबीन बियाणे वापरणेही अवघड होणार आहे.
- विलास मुसमाडे, शेतकरी तांभेरे, ता. राहुरी, जि. नगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chana MSP Registration: हरभरा नोंदणी १ मार्चपासून; हमीभावाने हरभरा विक्रीसाठी नोंदणी आवश्यक

Unseasonal Rain: अवकाळी अन् गारपिटीचा तडाखा

Urad Bonus: उडदासाठी ६०० रुपये बोनस, मोहरीसाठी भावांतर योजना; मध्य प्रदेश सरकारचा मोठा निर्णय

Chana Import Pressure on Prices: आयात तीनपट वाढली; हरभऱ्याचा भाव हमीभावापेक्षा १५ ते १८ टक्क्यांनी कमी

Sugarcane Crushing Season: पाच जिल्ह्यांतील दोन कारखान्यांचा हंगाम आटोपला, २३ सुरू

SCROLL FOR NEXT