Soybean Crop Damage : सोयाबीनसह जिल्हा कचेरीवर धडक

Farmers Protest : सोयाबीन पिकावर आलेल्या रोगांमुळे बरेच नुकसान झाले आहे. यासंदर्भात पंचनामे करून हेक्टरी ४० हजार रुपये मदत शेतकऱ्यांना द्यावी, या मागणीसाठी भीम ब्रिगेड संघटनेने शुक्रवारी (ता. २०) जिल्हा कचेरीवर धडक दिली.
Soybean Crop
Soybean CropAgrowon
Published on
Updated on

Amaravati News : सोयाबीन पिकावर आलेल्या रोगांमुळे बरेच नुकसान झाले आहे. यासंदर्भात पंचनामे करून हेक्टरी ४० हजार रुपये मदत शेतकऱ्यांना द्यावी, या मागणीसाठी भीम ब्रिगेड संघटनेने शुक्रवारी (ता. २०) जिल्हा कचेरीवर धडक दिली.

जिल्ह्यात दोन लाख ६० हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. परंतु या पिकाला तांबेरा रोगाने ग्रासले आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफीसह त्यांना हेक्टरी ४० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. शिवाय त्यांच्यासोबत असलेल्या काही शेतकऱ्यांनी कीड लागलेले सोयाबीनचे काही रोपटे उपटून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आणले.

Soybean Crop
Soybean Harvesting : सोयाबीनची उंची वाढली, उत्पन्न कमीच

जिल्हाधिकारी उपस्थित नसल्यामुळे सोयाबीनच्या पेंड्यांसह आंदोलक निवासी जिल्हाधिकारी यांच्या कक्षापर्यंत पोहोचले. जिल्ह्यात अमरावती, वरुड, मोर्शी, दर्यापूर, चांदूरबाजार, चांदूररेल्वे, भातकुली व तिवसा तालुक्यातील सोयाबीनचा पेरा करणाऱ्या शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळल्याची भीती यावेळी व्यक्त करण्यात आली.

Soybean Crop
Soybean Rate : सोयापेंडची निर्मिती वाढल्याने सोयाबीनच्या भावावर दबाव

गतवर्षीही समाधानकारक पीक झाले नाही तसेच पीकविमा मंजूर नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र वाढत असल्याबाबतची चिंता व्यक्त करण्यात आली. २०२३-२४ मध्ये सोयाबीन व कपाशीला अनुदान म्हणून हेक्टरी पाच हजार रुपये जाहीर करण्यात आली.

परंतु ही रक्कम न देता सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा आरोप आंदोलकांनी व्यक्त केला. या वेळी राजेश वानखडे, विक्रम तसरे, प्रवीण बनसोड, नितीन काळे, विजय खंडारे, अंकुश आठवले, उमेश कांबळे, अविनाश जाधव, मनोज चक्रे व शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com