Brush Cutter Agrowon
ॲग्रो विशेष

Brush Cutter in Farming : पीक कापणी साठी वापरा ब्रश कटर

Crop Harvesting Implements : ब्रश कटर हे एक शेतीकामासाठी बहुउपयोगी यंत्र आहे. छोट्या शेतकऱ्यापासून ते मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत सर्वासाठी हे यंत्र उपयुक्त आहे. ब्रश कटरचा उपयोग गवत, चारा तसेच पीक कापणीसाठी केला जातो.

Team Agrowon

Useful Harvesting Implements : ब्रश कटर हे एक शेतीकामासाठी बहुउपयोगी यंत्र आहे. छोट्या शेतकऱ्यापासून ते मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत सर्वासाठी हे यंत्र उपयुक्त आहे.  ब्रश कटरचा उपयोग गवत, चारा तसेच पीक कापणीसाठी केला जातो. ब्रश कटर बरोबर २ ते ३ वेगवेगळी जोडणी यंत्र उपलब्ध आहेत.  त्यामुळे या यंत्राद्वारे आंतरमशागतही करता येते.  या यंत्राचे इंजिन, शाफ्ट पाइप, हॅंडल आणि कटिंग युनिट असे चार प्रमुख भाग आहेत.

साधारणपणे, बाजारात ब्रश कटर दोन प्रकारात उपलब्ध आहे. पहिल्या प्रकारातील ब्रश कटर मनुष्याच्या उजव्या खांद्यावर बेल्टद्वारे अडकवून काम करता येते. दुसऱ्या प्रकारातील ब्रश कटर हे पाठीवर घेऊन काम करता येते. ज्याप्रमाणे पाठीवरील फवारणी पंप अडकवला जातो त्याप्रमाणे हा ब्रश कटर फिक्स केला जातो.

ब्रश कटर २ स्ट्रोक आणि ४ स्ट्रोक अशा दोन इंजिन मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. ब्रश कटरमध्ये नायलॉन दोरीचा वापर करून शेतात वाढलेले गवत कापले जाते. कटरची उपयुक्तता वाढवण्यासाठी त्याला वेगवेगळे गोलाकार दातेरी ब्लेड लावण्याची सुविधा आहे.

ब्लेडच्या प्रकारानुसार ब्रश कटरचा वेगवेगळा वापर केला जातो. गहू कापणी तसेच भात कापणी करण्यासाठी जास्त दातेरी ब्लेडचा वापर केला जातो. तसेच शेतातील, बांधावरील गवत जास्त वाढलेले असेल तर त्यासाठी २ ते ३ दातेरी ब्लेडचा वापर केला जातो. 

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

(ॲग्रो विशेष)

ब्रश कटर बरोबर २ ते ३ वेगवेगळी जोडणी यंत्र उपलब्ध असतात. त्यात दोन छोटे टिलर असतात. एका टिलरला ‘L’ आकाराचे ब्लेड असतात. दुसऱ्या टिलरला आडवे ब्लेड गोलाकार पद्धतीने जोडलेले असतात.

या टिलरचा उपयोग मातीची वरवर मशागत करण्यासाठी आणि पिकातील तण मुळासकट काढण्यासाठी केला जातो.कटरला चेन सॉ (करवत) जोडणी करता येते. तिचा उपयोग झाडाच्या अतिरिक्त वाढलेल्या फांद्या काढण्यासाठी करता येतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत महिला मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष; दोन जागांसाठी सात उमेदवार

Maharashtra Irrigation: राज्यातील पाणी वापर संस्थांची स्थिती चिंताजनक; निष्क्रिय संस्था बंद करायच्या का? विखे पाटलांचा सवाल

Nanded Farmer Death: १० हजारांचे कर्ज, ७० हजारांची मागणी; कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्याचं अपहरण अन् हत्या? फायनान्स कंपनीच्या कार्यालयात संशयास्पद मृत्यू

Crop Damage Panchnama: दोन हेक्टरच्या मर्यादेत पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश; शेतकऱ्यांच्या मदतनिधीला कात्री लागण्याची शक्यता

AI in Sugarcane Farming: ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे ऊस उत्पादन वाढीवर मार्गदर्शन; दुष्काळी परिस्थितीत कृषी विभागाची जनजागृती मोहीम

SCROLL FOR NEXT