Brush cutter : करडई कापणीसाठी ब्रश कटर

ब्रश कटर एका ठरावीक कोनामध्ये तिरके करून कापणी करावी. कापणीसाठी ६० किंवा ८० दात असलेले गोलाकार ब्लेड वापरावे.
Brush cutter
Brush cutterAgrowon
Published on
Updated on

आशिष धिमते

Kardai Harvesting : करडईच्या काढणीसाठी ब्रश कटरचा वापर करता येतो. यामुळे वेळ, मनुष्यबळ तसेच काढणीच्या खर्चात बचत होते. ब्रश कटर एका ठरावीक कोनामध्ये तिरके करून कापणी करावी.

करडई पिकाला असलेल्या काट्यामुळे हाताने कापणी करणे अवघड आणि कष्टाचे काम आहे. अलीकडे करडई कापणीसाठी कम्बाइन हार्वेस्टरचा वापर केला जातो. पण वेळेवर कम्बाइन हार्वेस्टर सर्वच ठिकाणी उपलब्ध होतो असे नाही.

म्हणून, पर्यायी मार्ग म्हणून करडईच्या काढणीसाठी ब्रश कटरचा वापर करता येतो. यामुळे वेळ, मनुष्यबळ तसेच काढणीच्या खर्चात बचत होते.

ब्रश कटरमध्ये प्रामुख्याने इंजिन, ड्राइव्ह शाफ्टसह हाउसिंग, गियर हब, कटिंग ब्लेड असेंब्ली, क्रॉप गाइड, हँडल आणि ऑपरेटरसाठी हँगिंग शोल्डर स्ट्रॅप बेल्ट यांचा समावेश असतो.

काढणीच्या वेळी थोडीशी आर्द्रता असावी. जेणेकरून नुकसान टाळले जाईल. रोपांची घनता, ओळीतील अंतर आणि रोपांची उंची यावर कापणी कशी करावी हे ठरवावे.

दोन किंवा तीन ओळी घेऊन कापणी करावी. शक्यतो गोलाकार पद्धतीने (शेताच्या बाहेरून आतमध्ये) कापणी करावी. म्हणजे कापलेली करडई उचलण्यास सोपे जाईल. दोन ओळींतील अंतर जास्त असेल, तर आडव्या पद्धतीने कापणी करत पुढे जावे.

Brush cutter
Kardai Cultivation : केव्हीकेच्या पुढाकाराने मांगूळ येथे करडई शेतीदिन

ब्रश कटर एका ठरावीक कोनामध्ये तिरके करून कापणी करावी. कापणीसाठी ६० किंवा ८० दात असलेले गोलाकार ब्लेड वापरावे. ब्रश कटरचे ब्लेड जास्तीत जास्त ६००० ते ७००० आरपीएम ने फिरते.

त्यामुळे अॅक्सिलरेटरचा योग्य वापर करून सरासरी वेग निर्धारित करावा. साधारणतः ३५०० ते ४००० आरपीएमवर करडईची व्यवस्थित कापणी होते.

ब्लेड बरोबर कलेक्टर गार्डचा वापर करावा. कापणीनंतर पीक एका बाजूला गोळा होण्यास मदत होईल.कापणी झाल्यानंतर वेचणी करताना हात मोजे (इंडस्ट्रीमध्ये वापरले जाणारे) वापरावेत.

ब्रश कटरच्या साह्याने एक हेक्टरवरील काढणीसाठी लागणारा वेळ हा विळ्याने काढणीच्या तुलनेत सुमारे ५० टक्क्यांनी कमी आहे.

कटरसाठी साधारणतः तासाला ७०० ते ८०० मिलि पेट्रोल लागते. ऑपरेटर आणि ब्रश कटरच्या वापरानुसार पेट्रोलचा कमी जास्त वापर होऊ शकतो.

ब्रश कटरने करडईची वेळेवर आणि कार्यक्षमतेने कापणी करता येते. याच प्रकारे ब्रश कटरचा वापर गहू कापणीसाठी करता येतो.

Brush cutter
Kardai Sowing : परभणी जिल्ह्यात करडई लागवडीत ९५ टक्के घट

ब्रश कटरचा वापर करताना घ्यावयाची काळजी

१) ब्लेड व्यवस्थित बसवावे. चांगल्या प्रकारे आवळून घ्यावेत.

२) वापर करताना सुरक्षा किटमध्ये असलेले गॉगल, कानासाठी असलेले आवरण, मोजे, हेल्मेट परिधान करावे. चालविण्याचे प्रशिक्षण घेऊन वापर करावा.

३) ब्रश कटर चालविण्यापूर्वी पेट्रोल तसेच ऑइलची मात्रा तपासावी.

४) ब्रश कटर चालवताना थोडा वेळ आराम घेऊन चालवावे. जेणेकरून व्हायब्रेशन आणि यंत्राच्या आवाजाने होणारा त्रास कमी होईल. कार्यक्षमता वाढेल.

५) यंत्र चालविताना ठरविलेल्या पर्यायाचा अवलंब करावा; पहिले ३५ मिनिटे यंत्र चालवावे. नंतर १० मिनिटे आराम करावा, परत २५ मिनिटे यंत्र चालवावे. त्यानंतर १५ मिनिटे आराम, परत २५ मिनिटे यंत्र चालवावे. त्यानंतर १५ मिनिटे आराम, परत १५ मिनिटे काम करावे, या क्रमाने ब्रश कटर चालवावे.

६) ब्रश कटरला जोडलेले ब्लेड हे जास्त वेगाने फिरते. जर त्याचा निष्काळजीपणाने वापर केला, तर इजा होण्याची शक्यता असते. ब्लेड जास्त वेळ जमिनीला लागू देऊ नये कारण ब्लेडचे आयुष्य कमी होते.

७) काम चालू असताना आपल्या आजूबाजूला कोणी असणार नाही याची काळजी घ्यावी. ब्लेड जमिनीला लागल्यानंतर दगड उडण्याची भीती असते. त्यामुळे जमिनीपासून योग्य अंतर ठेवून तसेच लक्षपूर्वक वापर करावा.

आशिष धिमते, ९५१८९०१०२७, (कृषी वैज्ञानिक, कृषी यंत्रे व शक्ती अभियांत्रिकी विभाग, केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था, हैदराबाद)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com