Sugarcane Harvesting Season agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : जिराईत भागातील जास्तीत जास्त ऊस संपवावा

Sugarcane Harvesting : ऊस वेळेत न तुटल्याने जळून जात आहे. यामुळे सोमेश्वर साखर कारखान्याचे सभासद शेतकरी होरपळत आहेत.

Team Agrowon

Baramati News : ऊस वेळेत न तुटल्याने जळून जात आहे. यामुळे सोमेश्वर साखर कारखान्याचे सभासद शेतकरी होरपळत आहेत. ऊसतोड मजूर पैसे मागून छळत आहेत. अशा वेळी संचालक मंडळाने त्याच्या बांधावर जाऊन त्याचे अश्रू पुसणे अपेक्षित असताना ते राजकीय व वैयक्तिक कामात व्यस्त आहेत, अशा शब्दात पुणे प्रादेशिक बाजार समितीचे माजी सभापती दिलीप खैरे यांनी संचालक मंडळाचे कान टोचले.

यावेळी खैरे यांनी तोडणी कार्यक्रमात तातडीने सुधारणा करून जिराईत भागातील सभासदांचा जास्तीत जास्त ऊस संपवावा, अशी मागणी कारखान्याकडे केली आहे. सोमेश्वर कारखाना साडेबारा लाख टन गाळप करणार होता. मात्र संचालक मंडळाचा अंदाज चुकल्याने व गेटकेन उसाचे सुरुवातीस गाळप केल्याने सभासदांच्या उसाचे गाळप लांबत आहे.

ऊसतोड मजूर पैसे मागत आहेत, ऊस जाळून तोडून शेतकऱ्यांचे नुकसान करत आहेत. या पार्श्वभूमीवर सोमेश्वरच्या विरोधी पॅनेलचे प्रमुख दिलीप खैरे यांनी कारखान्यास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाऊस अत्यल्प झाल्याने बारामती व पुरंदरच्या तालुक्यातील सोमेश्वर कारखान्याच्या जिराईत भागात पाण्याची टंचाई तीव्र झाली आहे.

ऊस जाग्यावर जळत आहेत. यातून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तोडणी कामगारही ऊस जाळूनच आणत आहेत. त्यामुळे उसाच्या वजनामध्ये मोठी घट येत आहे. ते शेतकऱ्यांकडून पैसे उकळत आहेत. संचालक मंडळ मात्र पैसे मागितल्यास तक्रार करा असे आवाहन करून मोकळे झाले आहे.

‘सभासदांना अतिरिक्त अनुदान द्या’

ऊस तोडीबाबत ‘सोमेश्‍वर’च्या व्यवस्थापनाचेच नियंत्रण हवे असते. संचालक मंडळातील सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आधार देणे आणि ऊस तोडणी यंत्रणा सक्षमपणे चालविणे गरजेचे आहे. संचालकांची मदत नसल्यानेच शेती विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांचे तोडणी वाहतूक यंत्रणेवरील नियंत्रण विस्कळित झाले आहे.

कारखाना बंद झाल्यावर त्यांनी आपापल्या कामांना वेळ द्यावा व सध्या सभासदांचे दुखणे सोडवावे. व्यवस्थापनाने सामंजस्याने तोडगा काढून शेतकऱ्यांना अतिरिक्त अनुदान द्यावे. तसेच शेतकऱ्यांना पैसे मागू नये म्हणून ऊस तोडणार, वाहतूकदार यांचेही नुकसान भरून काढावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT