Mango Season  Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Season : थंडी ठरविणार हापूस, केसरचे भवितव्य

Mango Update : नोव्हेंबरचा पहिला आठवडा संपला तरी हापूसच्या कलमांना अजूनही मोहर आलेला नाही. त्यामुळे या वर्षीचा हापूस हंगाम लांबणार असल्याचे निश्‍चित झाले आहे.

एकनाथ पवार / ॲग्रोवन वृत्तसेवा

Sindhudurg News : नोव्हेंबरचा पहिला आठवडा संपला तरी हापूसच्या कलमांना अजूनही मोहर आलेला नाही. त्यामुळे या वर्षीचा हापूस हंगाम लांबणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. दरम्यान, हा लांबलेल्या पावसाचा परिणाम असल्याचे मानले जात आहे.

या वर्षी ६ जूनला सुरू झालेला पाऊस २ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात सुरू होता. दरवर्षी सप्टेंबर अखेरपासूनच पावसाचा जोर कमी होऊन ऑक्टोबरच्या पहिल्या किवा दुसऱ्या आठवड्यात पाऊस थांबतो. मात्र या वर्षी पाऊस लांबला. त्याचे परिणाम या वर्षीच्या आंबा, काजू पिकांवर होणार हे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यातील हापूस कलमांना मोहर येण्याऐवजी सध्या पालवी फुटण्याची प्रकिया सुरू झाली आहे. ही पालवी जोपर्यंत पूर्ण तयार होत नाही, तोपर्यंत झाडांना मोहर येणार नाही. त्यामुळे झाडांना मोहर येण्यास डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे यावर्षीचा हापूस हंगाम लांबणार हे निश्‍चित मानले जात आहे.

दरवर्षी ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात झाडांना पालवी येते. आणि नोव्हेंबरमध्ये मोहर येतो. परंतु या वर्षी एक महिना उशिराने सर्व प्रकिया सुरू आहे. त्यामुळे हापूस हंगाम एक महिना लांबणार आहे. दरवर्षी जानेवारीअखेर किवा फेब्रुवारीपासून हंगामाला प्रारंभ होऊन मार्च मध्यानंतर हंगामाला गती प्राप्त होते. परंतु या वर्षी सर्वच हंगामाचे सर्वच गणित बिघडणार आहे.

जिल्ह्यातील किनारपट्टी भागातील देवगड, मालवण, वेंगुर्ला या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हापूस लागवड आहे. याशिवाय उर्वरित जिल्ह्यात देखील लागवड आहे. किनारपट्टी लगतचा आंबा हंगाम इतर भागांतील आंबा हंगामाच्या महिना ते दीड महिना अगोदर सुरू होतो. परंतु या वर्षी हंगाम लांबणार असल्याने आंबा बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

पाऊस लांबल्यामुळे ३० टक्के आंबा कलमांना पालवी आली आहे. तर उर्वरित ७० टक्के झाडांना पालवी आणि मोहर काहीही दिसत नाही. जर येत्या काळात थंडी पडली तरच चांगला मोहर येऊ शकेल. मात्र सद्यःस्थिती हंगामाच्या दृष्टीने चिंताजनक आहे.
रूपेश पारकर, आंबा बागायतदार, ता. देवगड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fruit Crop Cultivation : कळंबा गटाअंतर्गत फळबाग लागवड सुरू

Voter Registration : नव्या २३,४७५ मतदारांची अहिल्यानगर जिल्ह्यात नोंद

Mango Cashew Damage : आंबा, काजू लागवडीची गवा-रेड्यांकडून नासधूस

Maharashtra Election 2024 : मतदारांतील ‘सुप्त’लाटेची उमेदवारांना धास्ती

Fertilizer Shortage : जळगावात खतांची लिंकिंग, टंचाई; खतबाजारात शेतकऱ्यांची लूट

SCROLL FOR NEXT